विकास कामे व जनतेच्या विश्वासावर निवडणूकीला सामोरे जाणार Amdar Balasaheb Ajbe

 विकास कामे व जनतेच्या विश्वासावर निवडणूकीला सामोरे जाणार 
---------आ. बाळासाहेब आजबे




 आष्टी प्रतिनिधी 

मतदारसंघांमध्ये आपण गेल्या पाच वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे केली असून 20 -20 वर्ष आमदार राहिलेल्या पेक्षा पाच वर्षात जास्त विकास निधी खेचून आणला आहे प्रत्येक गावामध्ये विकास कामे दर्जेदार केले आहेत येणाऱ्या निवडणुकीत विकास कामाच्या जोरावर व जनतेच्या विश्वासावर आपण निवडणूकीला सामोरे जाणार असल्याचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी हिंगणी येथे बोलतांना सांगितले. 

       आष्टी तालुक्यातील हिंगणी येथे विविध विकासकामांचे लोकार्पण व उद्घाटन रविवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी आमदार बाळासाहेब आजबे यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता संपन्न झाले या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष काकासाहेब शिंदे युवा नेते महेश आजबे युवकचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब घुले राजेंद्र जरांगे हिंगणीचे सरपंच संभाजी झांबरे विलास झाम्बरे, लक्ष्मण ओव्हाळ सदाशिव झांबरे शहाजी झांबरे अनिल झांबरे सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता सौदागर शाखा अभियंता बादाडे उपस्थित होते यावेळी हिंगणी येथे चार कोटी 50 लाख रुपये किमतीच्या कामांचा लोकार्पण व तीन कोटी रुपये किमतीच्या रस्त्याचे उद्घाटन आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी बोलताना पुढे आमदार आजबे म्हणाले की गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आपण आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत प्रत्येक गावामध्ये विकास कामे कशी केली जातात याचे उदाहरण आपण दाखवून दिले आहे यापूर्वीच्या 20 -20 वर्ष आमदार राहिलेल्या आमदार मोहदयांणी विकास कामे फक्त नावापुरतीच केली व त्याचा दर्जाही जनतेला माहिती आहे त्यामुळे त्यांच्या वीस वर्षाच्या कालावधीतील विकास निधी आणि आपण आणलेल्या या पाच वर्षातील विकास निधी जास्त आहे मतदारसंघांमध्ये रस्ते पाणी आणि वीज या प्रश्नाला प्राधान्य देऊन सर्वसामान्य जनतेला आवश्यक असणाऱ्या बाबींची पूर्तता करण्याचे प्रामाणिक काम आपण गेल्या पाच वर्षांमध्ये केले आहे यापुढेही जनतेने संधी दिल्यास आपण मोठ्या प्रमाणात विकास कामे खेचून आणू आज पर्यंत 2300 कोटी रुपयांचे विकास कामे मंजूर करून आणले आहेत तर 200 कोटी रुपयांची विकास कामे मंजुरीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्यामुळे मतदारसंघात 2500 कोटी रुपयांची विकास कामे या पाच वर्षांमध्ये होत आहेत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण विकास कामाच्या जोरावर व जनतेच्या विश्वासावर सामोरे जाणार असल्याचेही शेवटी आमदार बाळासाहेब आजबे यांनी सांगितले या कार्यक्रमासाठी हिंगणी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.