मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत उच्च शिक्षित शिक्षण घेणाऱ्या मुलांची लावली थट्टा !

 मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत उच्च शिक्षित शिक्षण घेणाऱ्या मुलांची लावली थट्टा !



जर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजने अंतर्गत चिठ्ठी द्वारे निवड करत असेल तर इतर ठिकाणी शिक्षणाची पात्रता व परीक्षा कशाला 

काहींची शैक्षिणक पात्रता आधारे निवड तर काहींची चिठ्ठी द्वारे निवड 

हे तर असे झाले आंधळ दळतय आणि कुत्र पिट खातंय !!!


लवकर लवकर सदर योजनेची निवड प्रक्रियेवर चौकशी करण्यात यावी व उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांना न्याय द्यावा


सदर योजना ग्रामपंचायत स्तरावर निवड चुकीच्या पद्धतीने होत आहेत ती अमान्य आहेत .कुठल्याही उच्च शिक्षित शैक्षणिक कागदपत्रांच्या आधारे निवड न करता या प्रक्रिया सरळ ईश्वर चिट्टी द्वारे करण्यात येत आहेत. हा उच्च शिक्षित शिक्षण घेणाऱ्या मुलांवर अन्याय आहेत ?

काही दिवसापूर्वी फुलंब्री तालुक्यातील पंचायत समितीने शैक्षणिक धोरणानुसार पदवीधर मुलांना पात्र केले तर इतर मुलांना अपात्र केले. आणि आता २४ सप्टेंबर २०२४ पासून कुठलीही शैक्षणिक कागदपत्रे न तपासता ईश्वर चिट्ठी द्वारे निवड करण्यात येत आहेत हे शासकीय धोरण चुकीचे आहेत या वरती त्वरित स्थगिती आणावी .

    तसेच ईश्वर चिट्टी निवड प्रकिया तेव्हा घ्यावी जेव्हा एका पेक्षा अधिक मुले समान शैक्षणिक गुनवत्ता  धारक असेल मी पदवीधर व डिप्लोमा धारक असून माझी एका १२ वी पास मुलाबरोबर ईश्वर चिट्टी द्वारे निवड करण्यात येत आहेत आणि हे मला मान्य नाहीत,कदाचित या उच्च अधिकारी व शासन उच्च शिक्षित मुलांची या द्वारे चेष्टा करताय असे दिसून येते.

ईश्वर चिट्टी याच मार्गाने निवड करायची असेल तर याआधी निवड झालेल्या मुलांची नियुक्ती रद्द करून सर्व शासकीय निमशासकीय आणि mpsc व upsc ची निवड प्रकिया ईश्वर चिट्टी द्वारे करण्यात यावे अशी मागणी निवृत्ती सुदाम इधाटे फुलंब्री छत्रपती संभाजीनगर यांनी केली आहे .




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.