सोमवारी आष्टी येथे आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा
आष्टी ( रिपोर्टर )
शालेय विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कलेस वाव मिळावा म्हणून मराठा सेवा संघ या सामाजिक संस्थेच्या वतीने आष्टी येथे आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धा सोमवार दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी महात्मा गांधी विद्यालय, सोनवणे हॉस्पिटल जवळ आष्टी जिल्हा बीड येथे सकाळी 10:00 वाजता सुरू होतील. स्पर्धेसाठी 2001,1501,1001,501 असे आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
आष्टी पासून 25 किलोमीटरच्या परिघामध्ये असलेल्या माध्यमिक शाळा या स्पर्धेत भाग घेऊ शकतील. प्रत्येक शाळेने आठवी नववी किंवा दहावी या वर्गात शिक्षण घेत असलेल्या फक्त दोन स्पर्धकांना स्पर्धेसाठी पाठवायचे आहे. या स्पर्धेतील भाषणासाठी पुढील विषय ठेवण्यात आले आहेत १) अण्णाभाऊ साठे यांचे जीवन कार्य २) मानव जातीवरील कोविड-19 संकट ३) महामानव छत्रपती शिवाजी महाराज ४) मोबाईल वापर योग्य की अयोग्य ५) शेतकरी राजा उभ्या जगाचा पोशिंदा ६) ग्रामीण भागातील मुली गुणवत्तेमध्ये मुलांपेक्षा सरस ठरत आहेत. प्रत्येक स्पर्धकाने वरीलपैकी एका विषयावर भाषण करायचे आहे.
स्पर्धेचे सविस्तर नियम व अटी यासाठी ॲड सीताराम पोकळे पत्रकार (94 21 63 80 55), संयोजक अंतर शालेय वक्तृत्व स्पर्धा आष्टी केंद्र यांच्याशी संपर्क साधावा. किंवा महात्मा गांधी विद्यालय आष्टी चे मुख्याध्यापक जावेद पठाण सर यांच्याशी संपर्क करावा असे मराठा सेवा संघाचे अध्यक्ष इंजि. तानाजी बापू जंजिरे यांनी कळवले आहे.
stay connected