महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना आष्टी यांचे तर्फे आज तहसील कार्यालय आष्टी समोर धरणे आंदोलन
महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना आष्टी यांचे तर्फे आज दिनांक 24 9 2024 रोजी तहसील कार्यालय आष्टी समोर धरणे आंदोलन करण्यात आले. तलाठी व तत्सम पदास आरक्षण मिळावे निर्वाह भत्ता मिळावा कोतवाल पदाचे नामकरण महसूल सेवक करावे व इतर मागण्या साठी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना यांच्यातर्फे संपूर्ण राज्यभरात 24 रोजी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात येत आहे अहमदनगर येथे 25 रोजी काम बंद आंदोलन करण्यात येणार असून 26 तारखेला आझाद मैदान मुंबई येथे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे संपूर्ण राज्यभरातील कोतवाल कर्मचारी यामध्ये सहभागी झालेले आहेत यावेळी आष्टी तालुका अध्यक्ष अजिनाथ बनकर यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन करण्यात आले
stay connected