पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदींजीच्या स्वप्नातील स्वच्छ भारत नक्कीच साकार होणार आहे - डॉ.राहुल टेकाडे
भगवान महाविद्यालय व पंडित जवाहरलाल महाविद्यालय यांच्या वतिने ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली
आष्टी प्रतिनिधी
पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदींजीच्या स्वप्नातील स्वच्छ भारत नक्कीच साकार होणार आहे असे प्रतिपादन ग्रामीण रुग्णालय आष्टी चे वैद्यकीय अधीक्षक डॉ राहुल टेकाडे यांनी भगवान महाविद्यालय व पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालय यांच्या वतिने ग्रामीण रुग्णालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यावेळी ते बोलत होते पुढे बोलतांना डॉ राहुल टेकाडे म्हणाले की
स्वच्छता!” शब्द वाचताच मनात सौंदर्य फुलते. स्वच्छतेने मन प्रसन्न रहाते. या स्वच्छतारुपी सौंदर्याची आराधना करण्याची सवय अंगी बाळगण्यास शिकवण्याचे मोलाचे काम महाविद्यालय करते. समृध्द भारताच्या निर्माणामध्ये पहिले महत्वाचे पाऊल हे स्वच्छतेचे आहे. यासाठी आपण स्वत:बरोबर आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी अंगी बाळगणे महत्वाचे आहे. “Cleanliness is next to Godliness” या महात्मा गांधीच्या घोषवाक्यानुसार मा.पंतप्रधान श्री. मोदीजींनी स्वच्छतेचे महत्व लक्षात घेऊन ‘स्वच्छ भारत अभियानाची’ घोषणा केली.
यावर्षी 17 सप्टेंबर ते 2 ऑकटोबर या कालावधीत स्वच्छ भारत मोहीम पंधरवडा घोषीत करण्यात आला. मोदींनी ‘स्वच्छ संकल्प से स्वच्छ सिध्दी’ चे आवाहन केले होते. यानुसार भगवान महाविद्यालय व पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालय यांनी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली
तसेच वर्षभर विद्यार्थ्यांमध्ये शौचालयाचा वापर, हातधुण्याच्या सवयी आणि अन्य स्वच्छता सवयी अंगीकारुन स्वच्छताविषयक सवयीमध्ये वर्तनबदल घडुन आणण्यासाठी विविध दैनिक उपक्रम राबविले जावेत अस्वच्छ हातांमुळे अनेक रोगांना आमंत्रण मिळते म्हणून स्वच्छ हातासाठी विद्यार्थ्यांना हात धुण्याचे महत्व व हात धुण्याच्या विविध पद्धती समजावून सांगण्यात आल्या. महात्मा गांधीजीच्या, पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदींजीच्या स्वप्नातील स्वच्छ भारत नक्कीच साकार होणार आहे.यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.देवकर अशोक, प्रा.बाळासाहे गावडे, प्रा.गायकवाड अच्युत, प्रा.सानप चांगदेव सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने स्वच्छता करण्यासाठी सहभागी झाले होते
stay connected