नर्सिंग ला प्रवेश घेऊ इच्छित असणाऱ्या विद्यार्थी , विद्यार्थिनींनी 15 ऑक्टोबर पर्यंत प्रवेश घ्यावा व या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा
आष्टी प्रतिनिधी मनोज पोकळे
नर्सिंग ला प्रवेश घेऊ इच्छित असणाऱ्या बारावी ,कला ,वाणिज्य आणि विज्ञान या शाखेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थी, विद्यार्थिनींनी 15 ऑक्टोबर पर्यंत प्रवेश घ्यावा व सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य यांनी केले आहे. पुढे माहिती देतांना प्राचार्य म्हणाले की मा.आ.भीमराव धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी येथील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी संचलित, कॉलेज ऑफ नर्सिंग या महाविद्यालयास शासनाकडून परवानगी मिळालेली असल्याने जे विद्यार्थी ,विद्यार्थिनी प्रवेश घेऊ इच्छित आहेत, अशा विद्यार्थ्यांनी दिनांक 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत आनंद शैक्षणिक संकुल आष्टी, येथील कॉलेज ऑफ नर्सिंग आष्टी येथे संपर्क साधावा करोना नंतर आरोग्य क्षेत्राला सक्षम करण्यासाठी सरकारकडून मोठे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर पदभरती होत आहे. मोठ्या संख्येने नवी रुग्णालये सुरू होत आहेत. या पदभरतीत नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत.नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, राज्यातील सरकारी आणि खासगी रुग्णालयात रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होतात. एस .सी , एस टी,एन .टी ,ओबीसी,अशा सर्व स्कॉलरशिप धारक विद्यार्थी, विद्यार्थिनींना मोफत प्रवेश दिला जाईल अधिक संपर्का साठी या नंबर ८३८०८३०३०६,९३२२६६११३१, ९४२३४७१३९५. वर संपर्क साधावा
stay connected