प्रोजेक्ट लाडली या उपक्रमाचे आयोजन उल्हासनगर शहरामध्ये संपन्न
( प्रतिनिधी आशा रणखांबे )
ठाणे /उल्हासनगर
महिला व किशोरवयीन मुली यांच्यासाठी मासिक पाळी आणि संबंधित स्वच्छतेबद्दल सविस्तर माहिती व्हावी यासाठी प्रोजेक्ट लाडली या उपक्रमाचे आयोजन दिवंगत डॉ. कमलिनी गौतम बस्ते यांच्या स्मरणार्थ नुकतेच वीर तानाजी नगर, उल्हासनगर पाच येथे करण्यात आले.
पगारिया वेल्फेअर फाऊंडेशन नवी मुंबई, श्रावस्ती युवा सेवाभावी संस्था उल्हासनगर , बौद्ध विहार संघटना समन्वय समिती ठाणे आणि महामाया असंघटित महिला कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये महामाया असंघटित महिला कामगार संघटनेच्या अध्यक्षा तसेच बौध्द विहार संघटना समन्वय समितीचे शैक्षणिक विंग प्रमुख विजय हळदे यांचे मनोगत झाल्यानंतर श्रावस्ती युवा सेवाभावी संस्थेच्या प्रतिनिधी व काऊन्सलर ॲड. प्रज्ञा राऊत यांनी महिला व किशोरवयीन मुली यांच्यासाठी मासिक पाळी आणि संबंधित स्वच्छतेबद्दल
महत्त्वापूर्ण माहिती देऊन संवाद साधला तसेच माहितीपुस्तिका आणि व्हिडिओ क्लिप मार्फत उपस्थित महिलांना व किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन केले. महिलांच्या आरोग्य व्यवस्थित राहावं यासाठी वस्ती वस्तीवर, तसेच किशोरवयीन मुलीसांठी शाळांमध्ये अश्या प्रकारे उपक्रम भविष्यात घेण्यात येतील, असे आश्वासन श्रावस्ती युवा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष इं. गौतम बस्ते यांनी दिली.
या उपक्रमाच्या कार्यक्रमात उल्हासनगर मधील पत्रकार शशिकांत दायमा तसेच अँड मानसी खिस्मतराव यांची देखिल उपस्थिती लाभली. या कार्यक्रमात केक कापुन तसेच "मेन्स्टुपिडिया" या पुस्तिकेचे वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
stay connected