विधानसभा निवडणुकीत मतदारांनी जात- पात न पाहता कामाचा माणूस माजी आ. भीमराव धोंडे यांना सहकार्य करावे - माजी सभापती किसनराव पवार
आष्टी प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत मतदारांनी जात- पात न पाहता कामाचा माणूस म्हणून तसेच विकासाची दृष्टी असलेले माजी आमदार भीमराव धोंडे यांना सहकार्य करावे असे आवाहन पाटोदा पं. स. चे माजी सभापती किसनराव पवार यांनी कुसळंब येथे केले.
आष्टी विधानसभा मतदारसंघातील सर्व सामान्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व संवाद साधण्यासाठी माजी आ. भीमराव धोंडे यांनी शुक्रवार दिनांक २० सप्टेंबर रोजी जनसंपर्क अभियाना अंतर्गत पाटोदा तालुक्यातील सौताडा, भुरेवाडी, घुलेवाडी, कुसळंब, बेदरवाडी, सुपा, लांबरवाडी, सावरगाव ( घाट ),मुगगांव, वहाली,अंतापुर, चिखली, चिंचोली नाथ या गावांचा दौरा केला.कुसळंब येथे जागृत देवस्थान श्री क्षेत्र खंडेश्वराचे माजी आ. भिमराव धोंडे यांनी दर्शन घेतले. ठिकठिकाणी तोफा वाजवून वाजतगाजत माजी आमदार भिमराव धोंडे यांचे स्वागत करण्यात आले.
पुढे बोलताना किसनराव पवार यांनी सांगितले की. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार बोलतो कसा, दिसतो कसा, त्यांची जात कोणती आहे याचा कसलाही विचार न करता कामाचा माणूस म्हणून भिमराव धोंडे यांचा विचार सर्व मतदारांनी करावा व त्यांना विकास कामे करण्याची संधी द्यावी. माजी आ. भीमराव धोंडे यांनी पहिल्या पंधरा वर्ष आमदार असताना व मी पाटोदा पं.स. चा सभापती असताना सुमारे पाचशे पाझर तलाव या परिसरात केले होते. पाटोदा तालुक्यात प्रचंड विकास कामे केली आहेत. स्व. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते त्यावेळी पाटोद्याला मोठ्या प्रमाणात निधी आणला होता . सध्याचे राजकारण जातीपातीवर चाललेले आहे. काही लोकांकडून जाती-जातीत वाद लावायचे काम चालू आहे. जाती पातीवर चाललेले राजकारण भविष्याच्या दृष्टीने चांगले नाही. माजी आ. भीमराव धोंडे यांनी कसल्याही परिस्थितीत विधानसभा निवडणुकीत उतरावे, मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांना सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन किसनराव पवार यांनी केले.
वेगवेगळ्या गावात झालेल्या छोटेखानी बैठकीत माजी आमदार भिमराव धोंडे यांनी सांगितले की, मतदारसंघात मी मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. मी गावागावात, लोकां लोकात कधीच वाद लावण्याचे काम केले नाही. कधी पोलीस स्टेशनला फोन केला नाही. माझ्या काळात गुणवत्तेचे रस्ते केले आहेत त्यामुळे ते आजही टिकून आहेत. आरक्षणाला माझा विरोध नाही. आमच्या संस्थेत मराठा समाजाचे ५० ते ५५ टक्के कर्मचारी आहेत. तसेच इतर शंभरावर जातीचे कर्मचारी कार्यरत आहेत. मी कधीही जातपात पाहिली नाही. मी सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी काम करतो.
दौऱ्याच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी ॲड. विलास पवार, माजी सभापती किसनराव पवार, उपसभापती पांडुरंग नागरगोजे,माजी सभापती गवळी आप्पा, माजी सभापती काकासाहेब लांबरुड, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पवार, नवनाथ सानप, दत्ता नरसाळे व इतरांची भाषणे झाली. दौऱ्यामध्ये भाजपाच्या युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अजयदादा धोंडे, माजी सभापती काकासाहेब लांबरुड, संजय कांकरिया, दिलीपराव म्हस्के, माजी सरपंच नवनाथ सानप व इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते.
वेगवेगळ्या गावात झालेल्या कार्यक्रमास माजी सभापती गोवर्धन सानप, बाळासाहेब पवार, माजी जि. प. सदस्य शिवनाथ पवार, श्रीहरी पवार, नवनाथ सानप, माजी सरपंच भगवान सानप, शिवाजी पवार, माजी सभापती अनिल जायभाय, रमेश देशमाने, माजी सरपंच अंकुश लांबरुड, ग्रा.पं. सदस्य परसराम गायकवाड, पांडुरंग सानप, भगवान पेचे, महादेव पवार, देविदास सानप, बाबासाहेब घुले, प्रशांत घुले, गहिनीनाथ सानप, महादेव भोरे , कृष्णा पुलावळे, रणजित सानप, दत्तू शिंदे, नाना सानप, किरण पवार , परसराम पवार, मंगेश पवार, बाळू सानप, हमीद शेख, सरपंच तात्यासाहेब लाड,शाहुराव लाड, माजी सरपंच गहिनीनाथ लाड,सलमान पठाण, सतीश सानप, शहादेव सानप, राजेंद्र भोरे, गोरख पोले, शरद शेंबडे, विलास कोल्हे, केशव शेंबडे, अंकुश सांगळे, भाऊ घुले, निलेश पवार, संजय गायकवाड, युवराज थोरात, भाऊसाहेब मानमोडे, बाबासाहेब लांबरुड, ऋषिकेश लांबरुंड, अंकुश गाडे, बाबा भवर, विजू शेकडे, नाना पवार, सुभाष पवार, रोहिदास खोटे, परसराम खोटे,तुषार पवार, भिमराव सरोदे व इतरांची उपस्थिती होती.
stay connected