आष्टीत उपमुख्यमंत्री अजित पवार कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत जनसंवाद यात्रा : मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - आ बाळासाहेब आजबे

 आष्टीत उपमुख्यमंत्री अजित पवार कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत जनसंवाद यात्रा : मोठ्या संख्येने उपस्थित राहावे --आ.बाळासाहेब आजबे 


https://www.tejwarta.in/2024/08/tejwarta-news-network-29-august-2024.html



आष्टी प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे कृषी मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी दुपारी 01वाजून 30 मिनिटांनी आष्टी येथे जनसंवाद यात्रा व जाहीर सभेचे आयोजन केले आहे तरी आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील माता-भगिनी शेतकरी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी केले आहे 

       गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता आष्टी येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जनसंवाद यात्रा आष्टी मध्ये येणार आहे यावेळी त्यांचे आमदार बाळासाहेब आजबे काका व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने भव्य असे स्वागत करण्यात येणार आहे यासाठी 5 हजार महिला भगिनी उपस्थित राहणार असून मोठ्या संख्येने शेतकरी व मतदारसंघातील लोक उपस्थित राहणार आहेत जनसंवाद यात्रेच्या स्वागत समारंभा नंतर आष्टी येथे मोरेश्वर लॉन्स या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे कृषिमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे महिला आयोगाचे अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर सभा होणार असून यावेळी उपस्थित महिला भगिनी व शेतकऱ्यांच्या प्रश्न ते ऐकून घेणार आहेत या कार्यक्रमासाठी आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार बाळासाहेब आजबे यांनी केले आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.