अमोलक संस्थेत प. पू. विश्वदर्शनाजी म. सा. यांच्या हस्ते ध्वजारोहण

 अमोलक संस्थेत प. पू. विश्वदर्शनाजी म. सा. यांच्या हस्ते ध्वजारोहण




आष्टी प्रतिनिधी - येथील श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने १५ ऑगस्ट रोजी मधुरव्याख्यानी प. पूज्य श्री विश्वदर्शनाजी म. सा. व प. पू. किर्तीसुधाजी म. सा. आदी ठाणा २ यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. शतक महोत्सवी वर्ष साजरे करीत असलेल्या अमोलक संस्थेने विविध कार्यक्रम आयोजित करुन या वर्षी स्वातंत्र्य दिन साजरा केला. सदरील कार्यक्रमांमध्ये सुरुवातीला थोर नेत्यांच्या प्रतीमेचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले. त्यानंतर एनसीसी आणि स्काऊट गाईड च्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन करून प्रमुख मान्यवर पाहुण्यांना मानवंदना दिली. त्यानंतर चंदनमल भळगट प्राथमिक विभागातील विद्यार्थिनी कु. सृष्टी दळवी व अमोलक युनीव्हर्सल इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थिनी कु. माहेरा पठाण या  विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त भाषण केले. तसेच इंग्लिश मीडियम मधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य व गीत सादर करून प्रेक्षकांची व विद्यार्थ्यांची वाहवा मिळवली. या कार्यक्रमानंतर प. पूज्य श्री विश्वदर्शनाजी म. सा. यांनी देशभक्ती व स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व तसेच पर्यावरण विषयक महत्त्वपूर्ण माहिती दिली आणि आपल्या मधुर व्याख्यानातून विद्यार्थ्यांना संबोधित केले. त्यानंतर संस्थेचे सचिव श्री हेमंत पोखरणा यांनी संस्थेचे इतिवृत्त सांगितले व स्वातंत्र्य दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले. त्यानंतर प्रशासकीय अधिकारी श्री नवनाथ पडोळे सर यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष योगेश भंडारी, कार्याध्यक्ष कांतीलाल चानोदीया, विश्वस्त अध्यक्ष गोकुळदास मेहर, उपाध्यक्ष अनिल झाडमुथा, बिपिन भंडारी, सचिव हेमंत पोखरणा, मंत्री डॉ महेंद्र पटवा, कोषाध्यक्ष डॉ उमेश गांधी, ट्रस्ट उपाध्यक्ष बाबूलाल भंडारी, संचालक संजय मेहेर, योगेश चांनोदिया, संतोष भंडारी, संतोष गांधी, संजय भंडारी, ललित कटारिया, अजय चोरबेले, संतोष शिंगवी विश्वस्त दिलीप पटवा पोपटलाल भळगट, जैन श्रावक संघाचे अध्यक्ष श्री रतिलाल कटारिया, श्री शांतीलाल शिंगवी सर जयंतराव सांगा चे उपाध्यक्ष श्री नितीन शिंगवी, मा.सरपंच श्री अनिल तात्या ढोबळे,गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जवाहर भंडारी, प्रशासकीय अधिकारी पडोळे सर, मुख्याध्यापक शिकारे सर, सरडे सर , गोले सर, कोकणे सर, गुगळे सर ,डी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य महेश मस्के सर, बी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ गफार सय्यद सर, कार्यालयीन अधीक्षक ललवाणी सर ,मोहसीन सर मुख्याध्यापिका चौधरी मॅडम प्राचार्य गुंदेचा मॅडम सोनवणे मॅडम उपस्थित होते




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.