सामाजिक कार्यकर्ते गि-हे यांचा उपोषणाचा सहावा दिवस
--------------------------
पाणीही सोडणार ! प्रशासनाकडून ठोस दखल नाही
----------------
राजेंद्र जैन / कडा
-----------
राज्यातील संयुक्त जमिनीची व गावठाण मोजणी करण्याच्या मागणीसाठी निमगाव चोभा (ता आष्टी) येथील सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल गि-हे यांनी मागील सहा दिवसापासून गावात श्रीराम मंदिरात आमरण उपोषण सुरू केले आहे. मात्र प्रशासनाकडून अद्याप त्यांच्या उपोषणाची दखल न घेतल्यामुळे गि-हे यांनी उपोषण चालू ठेवून उद्यापासून पाणी देखील घेणार नसल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
Vdo पाहा
याबाबत सविस्तर वृत्त असे की आष्टी तालुक्यातील निमगाव चोभा येथील सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल गि-हे यांनी महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण संयुक्त जमिनीची मोजणी व गावठाण मोजणीसह शिवरस्ते सर्वे नंबर रस्ते मोजणी करण्यासाठी दि.१/०३/२०२४ रोजी प्रशासनाला उपोषण करण्याबाबत निवेदन दिले होते. मात्र या संदर्भात प्रशासनाकडून कुठलीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे कांतीलाल गि-हे यांनी दि.१/०८/२०२४ पासून निमगाव चोभा येथील श्रीराम मंदिरात उपोषण सुरू केले असून, उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. मात्र प्रशासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नसल्याचे गि-हे यांचे म्हणणे आहे. आपल्या उपोषणाची प्रशासनाने दखल न घेतल्यास उद्यापासून आपण पाणी देखील ग्रहण करणार नसल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री, महसूल मंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदारांसह पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आलेले आहे.
---------%%---------
सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल गि-हे यांचे निमगावचोभा मागील सहा उपोषण चालू आहे. या उपोषणस्थळी तहसीलदार प्रमोद गायकवाड, मंडळाधिकारी वर्धमान देवधरे, तलाठी राऊत नाना, भूमी अभिलेख निरिक्षक विजय गायकवाड यांनी भेट दिली. उपोषणार्थी गि-हे यांच्या ज्या मागण्या आहेत, त्या संदर्भात वरिष्ठांना कळविण्यात आले. असल्याचे प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
------%------------
stay connected