आमदार असताना कोणत्याही कामात टक्केवारी घेतली नाही - मा. आ.भिमराव धोंडे

 आमदार असताना कोणत्याही कामात टक्केवारी घेतली नाही - मा. आ.भिमराव धोंडे 





आष्टी प्रतिनिधी - मी वीस वर्ष विधानसभा सदस्य होतो परंतु कोणत्याही कामात कधीही  टक्केवारी घेतली नाही, टक्केवारी घेतल्यामुळे कामात गुणवत्ता राहत नाही तसेच ते काम जास्त दिवस टिकत नाही असे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी पाटोदा तालुक्यातील अंमळनेर, पिंपळवंडी परिसरात झालेल्या जनसंपर्क अभियान दौऱ्याच्या निमित्ताने ठिकठिकाणी झालेल्या कॉर्नर बैठकीत सांगितले. 

         आष्टी विधानसभा मतदारसंघातील सर्व सामान्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी माजी आ. भीमराव धोंडे यांनी जनसंपर्क अभियाना अंतर्गत पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी व अंमळनेर परिसरातील वाड्या वस्त्यावर  फिरून लोकांच्या भेटी घेऊन  संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.  दौऱ्याच्या निमित्ताने माजी आ. भीमराव धोंडे यांचे ठिकठिकाणी वाजतगाजत व तोफा वाजवुन जोरदार स्वागत  करण्यात आले. आष्टी,  पाटोदा, कडा,  शिरूर, धामणगाव नंतर  १ ऑगस्ट रोजी अंमळनेर ,उंडेवाडी, साबळेवाडी, पिंपळवंडी  या गावाचा दौरा केला या दौऱ्याला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांच्या समवेत युवा नेते अजयदादा धोंडे, उपसभापती पांडुरंग नागरगोजे, अभयराजे धोंडे,  सुदाम मोरे, रमेश शिरसाट, सुरेश पवार, प्रा. दत्ता नरसाळे व इतर उपस्थित होते. 

       पिंपळवंडी येथील दलीत वस्ती, नाकाडेवाडी, जरेवाडी, आंबेवाडी, चंद्रेवाडी व  अंमळनेर येथील दलीत वस्ती, मिसाळ वाडी, डागाची वाडी, बाजार पेठेत फिरून लोकांशी व व्यापाऱ्यांशी संवाद साधला. पिंपळवंडी व अंमळनेर  येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच अंमळनेर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भेट दिली.  गणपती मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेतले.

तसेच निट परिक्षेत ६५१ गुण मिळविल्या बद्दल अंमळनेर येथील वैभव राख यांचा सत्कार करण्यात आला.

         पुढे बोलताना  माजी आमदार भिमराव धोंडे यांनी सांगितले की, मी विधानसभा सदस्य असताना अनेक रस्ते डांबरीकरण केले आहेत. १० ते २० टक्के कमिशन घेतल्यामुळे कामाची गुणवत्ता खालावते. गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय केली आहे. या मतदारसंघात इतर कोणीही  शिक्षणाची सोय केली नाही. तुमची  भावी पिढी चांगली घडविण्यासाठी  शिक्षणाची सोय झाली.  माझ्या काळात कोणावरही अन्याय केला नाही. आता लोकांनी चिंतन करण्याची गरज आहे. आपल्या शिक्षण संस्थेत मतदारसंघातील ४० हजार मुले शिक्षण घेत आहेत. समाज हितासाठी काम करणाऱ्यांना सहकार्य करा.ठिकठिकाणी झालेल्या छोटेखानी बैठकीत डॉ. अनिल मिसाळ, भाऊसाहेब ससे, उत्तमराव पवार व इतरांची भाषणे झाली त्यांनी सांगितले की, माजी आमदार भीमराव धोंडे यांनी मतदारसंघात शिक्षणाचे जाळे निर्माण केले. पुर्वी मुलींना पालक  शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवत नव्हते परंतु मा आ भिमराव धोंडे यांच्यामुळे गावागावात मुलींच्या शिक्षणाची चांगली सोय झाली. विधानसभा सदस्य असताना त्यांच्या कार्यकाळात रस्त्याचे अनेक कामे केली. ते एक शांत, संयमी असे व्यक्तीमत्व आहे.,दौऱ्यामध्ये श्री स्वामी महादेवानंद भारती महाराज अश्वत्थलिंग महादेव मंदिर,  जरेवाडी येथील जि. प.  आदर्श शाळा, राजु मोरे, राजेंद्र दत्तात्रय पाटील,  माजी सरपंच बाबासाहेब नाकाडे, पांडुरंग नाकाडे, राजु माळी, महादेव नकाडे, राजेंद्र पवार ,  वसंत नरसाळे, अकील शेख, रशिद शेख, माजी सरपंच विलास  पटवा, शेखर पवार,  सुदाम मोरे, हेमराज उंडे, सांगळे मिठाई वाले, सुंदरलाल बाफना , किरण वनारसे, दिलीप पांगरे, काकासाहेब नरसाळे, विठ्ठल पवार, ज्योती क्रांती बॅंक, सतीष पवार, अशोक पवार, दिलीप पोकळे, मकरंद बेदरे, प्रल्हाद वाघ,माजी ग्रा.पं. सदस्य नामदेव कदम, मनोज वनारसे, माजी सरपंच मुरलीधर पवार, बेदरे बंधु, सुधाकर पवार, हुसेन तांबोळी , नितीन हेंद्रे, दादासाहेब धनवडे, भगवान उंडे यांच्या निवासस्थानी भेटी दिल्या. 

 ठिकठिकाणी  उत्तम पवार,माजी सरपंच राजेंद्र वारे, बंडू पवार, सुरेश पवार, शिवाजी पवार, राजेंद्र पवार, सुदाम मोरे, जरे, जालिंदर राऊत, भानुदास शिंदे, विक्रम म्हस्के, प्रशांत पवार, बाबासाहेब पवार, दिलीप पवार, पिंपळवंडी ग्रा. पं. सदस्य देविदास कापसे, ग्रा. पं. सदस्य हरिश्चंद्र पवार, शाहुराव शेळके, आबासाहेब कापसे,मोरे मामा, गोविंद गाडे, म्हातारदेव मिसाळ ,  सुखदेव मिसाळ, शहादेव पाटील, श्रीधर पाटील, सतिष पवार, चंद्रभान मिसाळ, केशव सानप, लहु मिसाळ, अर्जुन पवार, विष्णुपंत राजपुरे, यादव साबळे, अर्जुन साबळे, भगवान उंडे, भारत पवार, इतरांनी माजी आमदार भीमराव धोंडे यांचे स्वागत केले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.