मोबाईल अॅप चालेना,पोर्टवरही फाॅर्म अपलोड होईना ------------------------ लाडक्या बहिणी फाॅर्म भरण्यापासून अजूनही वंचित

 मोबाईल अॅप चालेना,पोर्टवरही फाॅर्म अपलोड होईना
------------------------
लाडक्या बहिणी फाॅर्म भरण्यापासून अजूनही वंचित



-------------

राजेंद्र जैन / कडा 

--------------

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची राज्यात मोठी चर्चा झाली. मात्र या योजनेचे फाॅर्म भरणे मोबाईल अॅपव्दारे चालू केले. मात्र मागील काही दिवसांपासून मोबाईल अॅप चालत नसल्याने मोठा अडथळा निर्माण झाल्यामुळे अनेक बहिणी या योजनेचा फाॅर्म भरण्यापासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

मुख्यमंत्री लाडकी बहिण या योजनेचे फाॅर्म भरण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष पोर्टल चालू केले आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रति महिना १५००/- रुपये मिळणार आहेत. मात्र मोबाईल अॅप सुरुळीतपणे चालत नसल्याने अनेक महिलांना या समस्यांचा सामना करावा लागत आहे. मागील काही दिवसांपासून या पोर्टलवर फाॅर्म अपलोड होत नसल्याची समस्या निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरताना ओटीपी लवकर जात नाही. हा फाॅर्म अपलोड होत नसल्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत. लाडकी बहिण हे पोर्टलही व्यवस्थित चालत नसल्यामुळे अनेक बहिणींचे फाॅर्म भरणे अद्याप बाकी आहेत. त्यामुळे ब-याचदा सेतू केंद्र चालकांना देखील महिलांच्या रोषाला नाहक सामोरे जावे लागत आहे. या योजनेचा फाॅर्म भरण्यासाठी ठिकठिकाणी सेवा सेतू केंद्रांवर महिलांची गर्दी होत आहे. शासनाने ही महत्वकांशी योजना चालू केली असली तरी पोर्टलवर लाडक्या बहिणींचे फाॅर्म अपलोड होत नसल्याने महिला सेतू केंद्रावर चकरा मारुन अक्षरश: त्रस्त होताना दिसत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने लाडकी बहिण हे पोर्टल तातडीने सुरुळीत करण्याची मागणी महिलांकडून होऊ लागली आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.