मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक आष्टी विधानसभा लढवणारच.

 मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक आष्टी विधानसभा लढवणारच.




आष्टी (प्रतिनिधी)

     आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार उभा करण्याचे ठरवल्यास २३१ आष्टी विधानसभेतून शिव संघर्ष ग्रुप महाराष्ट्र राज्यांचे सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार सुरेश पाटील हेच एकमेव उमेदवार असतील असे बोलले जात आहे. तशी चर्चा गावोगावी पारावर होतांना दिसत आहे.

     मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलनापासून समर्थन करणारे आणि वेळोवेळी पाठिंबा देणारे शिव संघर्ष ग्रुपचे महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी तथा ज्येष्ठ पत्रकार सुरेश पाटीलच आहेत. त्यामुळे मराठा योध्दा मनोजदादा जरांगे पाटील यांनी आगामी काळात विधानसभेसाठी उमेदवार उभे करण्याचे ठरवल्यास किंवा पाठींबा देण्याचे ठरवल्यास सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार सुरेश पाटील यांना प्रथम प्राधान्य द्यावे लागेल. अशी चर्चा आष्टी-पाटोदा-शिरूर (का.) मतदार संघातून होत आहे. मनोज जरांगे पाटील यांचा बीड जिल्ह्यात जेव्हा जेव्हा दौरा असेल तेव्हा तेव्हा सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील यांनी वेळोवेळी त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी आरक्षणाबद्दल व मराठा समाजाबद्दल चर्चा केलेली आहे. व दौऱ्यात सहभागी झाले आहेत. त्यामुळे आष्टी-पाटोदा-शिरूर कासार या मतदारसंघात सुरेश पाटील यांना मानणारा आणि त्यांच्यावर प्रेम करणारा खुप मोठा सामाजिक ग्रुप आहे. आष्टी,पाटोदा,शिरूर तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर कामगार यांच्या मदतीला वेळोवेळी धावून जाणारे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सुरेश पाटील हक्काचा माणूस असल्याने या मतदारसंघात जरांगे पाटील यांचे खंदे समर्थक सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील असून मानोजदादांनी सुरेश पाटील यांना पाठींबा दिल्यास ते आष्टी विधानसभेतून निवडून येथील अशी चर्चा जोर धरू लागली आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.