कृषीरत्न बाबासाहेब पिसोरे यांचे कडधान्यवर्गीय पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन
दीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्र अंबाजोगाई
कृषी आणि किसान कल्याण मंत्रालय भारत सरकार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत समुह प्रथम दर्शनी प्रात्यक्षिक योजना-२०२४ अंतर्गत कडधान्यवर्गीय पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी नविन तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार शेतकऱ्यांमध्ये व्हावा या उद्देशाने प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमात शेतकऱ्यांची मनोगते व मान्यवरांचे मार्गदर्शन झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. उपेंद्र कुलकर्णी प्रकल्प संचालक, दी. शो.सं. बीड प्रकल्प
हे होते तर प्रमुख उपस्थिती मा. श्री. गोरख तरटे तालुका कृषि अधिकारी, आष्टी तसेच प्रमुख मार्गदर्शक मा. श्री. बाबासाहेब पिसोरे कृषिरत्न, कृषिभुषण हे होते .युग लॉन्स, आष्टा (ह.ना. फाटा), ता. आष्टी, जि. बीड येथे दि . २७/०८/२०२४ (मंगळवार) रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला . याप्रसंगी कृषीरत्न पुरस्कार विजेते बाबासाहेब पिसोरे यांनी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले .
stay connected