घोडके परिवाराने पर्यावरणाशी नाते जपले उद्धव दरेकर, आजीच्या स्मरणार्थ २०० आंबा रोपांचे वाटप

 घोडके परिवाराने पर्यावरणाशी नाते जपले 
उद्धव दरेकर, आजीच्या स्मरणार्थ २०० आंबा रोपांचे वाटप



आष्टी : ग्लोबल वार्मिंगचे युगामध्ये प्रत्येकाने पर्यावरणाची बांधिलकी जपली पाहिजे. त्याचा पायंडा आज पारोडी मध्ये घोडके परिवाराने घातला आहे. आजीच्या दशक्रिया विधीच्या कार्यक्रमात सुमारे 200 आंब्याच्या रोपांचे वाटप केले. घोडके परिवाराने पर्यावरण पूरक उपक्रम राबवून समाजाला एक वेगळा आदर्श घालून दिला, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सभापती उद्धव दरेकर यांनी केले.

तालुक्यातील पारोडी येथील कै. लक्ष्मीबाई दत्तोबा घोडके यांचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम नुकताच झाला. यावेळी राजेंद्र महाराज गाढवे यांचे प्रवचन झाले. घरामध्ये दुःखद घटना घडली असली तरी पारंपरिक विधी बरोबरच आपण निसर्गाचे काहीतरी देणे लागतो विचारातून आणि दादासाहेब घोडके यांच्या संकल्पनेतून दशक्रिया विधीसाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आंब्याचे रोपटे देण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सभापती उद्धव दरेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश शिंदे, सरपंच सागर आमले, सरपंच राधेश्याम धस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष परमेश्वर शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब शिंदे, शिवसेना नेते भाऊसाहेब लटपटे, अमोल तरटे, डॉ. संतोष जाधव, रविंद्र ढोबळे, माजी पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष वाळके, सरपंच जयसिंग गव्हाणे, कडा बाजार समितीचे माजी सभापती अशोक इथापे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब घुले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव डोके, सरपंच संदिप खकाळ, अव्वल कारकून भगीरथ धारक, सरपंच विजय गाढवे, सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे, प्रा. भवर सर, नवनाथ गर्जे, अभय गर्जे, शिवाजी शेकडे, विजय शेळके, राजेश कराड, श्रीराम गोंदकर, संतोष गुंड, बाळासाहेब गव्हाणे, संजय विधाते, बाळासाहेब झांबरे, सरपंच सासवडे सर, बाळासाहेब कावरे, सुभाष वाळके, बाबासाहेब बिटे, सरपंच विकास अमृते, प्रविण लाळगे, नितीन मिसाळ, हनुमंत पोटरे, मनोहर सरोदे, अतुल खकाळ, बाळासाहेब निकम, हरिभाऊ दहातोंडे, सरपंच भरत जाधव, संजय विधाते, संभाजी आंधळे, शामराव फसले, ताराचंद कानडे, सुहास जगताप, जालिंदर कानगुडे, उद्धव विधाते,  अक्षय लटपटे, मधुकर वाळके, पांडुरंग शेलार, गणेश धस, कैलास दोरगे, जगताप पाटील, निलेश शितोळे, सुंबे महाराज, रेवणनाथ जाधव, अभिजीत जंजिरे, नाना आमले, बाळासाहेब कावरे, पत्रकार डॉ. सूर्यकांत वरकड, बबन विधाते, वाळुंजचे सरपंच सातपुते, सरपंच बंकट परकाळे यांच्यासह तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नातेवाईक व मित्र परिवार, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्धव दरेकर म्हणाले, घोडके परिवारातील आजीचा नातू दादा हा माणसं जोडणारा माणूस आहे. त्यामुळेच आज एवढं माणसांचं वैभव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आजीचे विचार चिरंतन स्मरणात राहावे. त्यातून कुटुंबाला प्रेरणा मिळावी. याच संकल्पनेतून घोडके परिवाराने आलेले नातेवाईकांना आंब्याचे रूप देण्याचा उपक्रम राबवला. हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. यातून इतरांनी बोध घ्यावा असे ते म्हणाले. शेवटी रोजगार हमी योजनेचे कार्यक्रम अधिकारी दादासाहेब घोडके यांनी आभार मानले.


पारोडी : आजीच्या दशक्रिया विधीनिमित्त वृक्ष वाटप करताना दादासाहेब घोडके, सुंबे महाराज, राजेंद्र महाराज गाढवे आदी.

.....





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.