चिंचोली येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता
धानोरा (प्रतिनिधी ) - आष्टी तालुक्यातील चिंचोली येथील मारूती मंदीरात दि . 9 ऑगस्ट पासुन अखंड हरिनाम सप्ताह सुरू होता . या सप्ताहाची सांगता आज दि . 17 ऑगस्ट 2024 रोजी हभप राऊत दादा महाराज यांच्या काल्याचे किर्तनाने सप्ताहाची सांगता झाली . या प्रसंगी सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला . यावेळी परमेश्वर काका शेळके , सागर आमले , शिरीष भाऊ थोरवे , चांगदेव एकशिंगे , सरपंच हनुमंत आडागळे , उध्दव कर्डीले , दगडू गवळी ,मोहन एकशिंगे , नामदेव एकशिंगे , बापू इथापे , बबन अडागळे , भाऊसाहेब लांडगे सर आदी ग्रामस्थ उपस्थित होते .
stay connected