आष्टी तालुक्यात दूध भेसळ करणाऱ्यांवर कारवाई अन्न औषध प्रशासन पोलीस व जिल्हाधिकारी यांची संयुक्त कारवाई

 आष्टी तालुक्यात दूध भेसळ करणाऱ्यांवर कारवाई अन्न औषध प्रशासन पोलीस व जिल्हाधिकारी यांची संयुक्त कारवाई




आष्टी तालुक्यातील कडा येथे अन्न व औषध प्रशासन, पोलिस प्रशासन व जिल्हाधिकारी यांनी संयुक्तपणे कारवाई करत टाकळी व कडा येथे बनावट दूध तयार करण्याचे साहित्य आढळल्याने कारवाई केली . कृत्रीम दुध निर्मिती करण्यासाठी जे रसायने वापरतात त्याची विक्री करणाऱ्या दुकानावरही कारवाई सुरू आहे . अंबादास चौधरी  यांच्या दुधाच्या प्लॅन्ट वरही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधीकारी अविनाश पाठक यांनी दिली . जिल्हाधिकारी स्वतः या ठिकाणी तळ ठोकून आहेत .

Vdo पहा 👇📽️



आष्टी तालुक्यातील आमिया टाकळी येथे अन्न औषध प्रशासनाने छापा मारून बनावट दुध बनविण्याचा साठा जप्त केला असून यामुळे आता भेसळयुक्त दुधाची विक्री अनेक किती ठिकाणी होते याचा तपास आता प्रशासन घेत आहे.

बीड जिल्ह्यात दुधाची होतं असलेली भेसळयुक्त विक्री आता चव्हाट्यावर येतं आहे. आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया येथे अन्न औषधं प्रशासन व पोलिसांनी तसेच जिल्हाधिकारी साहेब यांनी संयुक्त कारवाया करत ३०० पोत्यापेक्षा अधिक पावडरचा साठा जप्त केल्याचे कळते. काल रात्रीपासून हा साठा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु आहे.






मागच्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यात बनावट दूध विक्रीचा धंदा जोरात सुरु आहे. याबाबत अन्न औषधं प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या समेवत टाकळी अमिया येथे छापा मारण्यात आला. यात ३०० गोण्या पावडरच्या साठ्याच्या आढळून आल्या असून अजूनही साठा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. काल रात्रीपासून पोलीस आणि अन्न प्रशासन घटनास्थळी तळ ठोकून आहेत. याकडे जिल्हाधिकारी साहेब जातीने लक्ष घालत आहेत .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा साठा अंबादास चौधरी यांचा असल्याचे कळते. याप्रकारणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. कडा येथेही बनावट दुध निर्मीती चे साहित्य विक्री करणाऱ्या एका दुकानावर धाड टाकण्यात आली आहे . हि कारवाई शनीवार दि ३ व रविवार दि . ४ रोजी करण्यात आली . अजुनही गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू असून रात्री 10 वाजेपर्यंत ही प्रक्रीया पूर्ण होईल असे जिल्हाधिकारी पाठक साहेब यांनी  पत्रकारांना सांगितले

या कारवाईने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी संदिप देवरे, अनुराधा भोसले, सहाय्यक आयुक्त कांबळे, आष्टीचे पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे, सहायक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे, स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे, पोलीस हवालदार बबुशा काळे, पोलीस नाईक प्रवीण क्षीरसागर, विकास जाधव, अंमलदार मजरूद्दीन सय्यद, सचिन गायकवाड, दिपक भोजे, सचिन पवळ, महिला अंमलदार जिजाबाई आरेकर, अर्चना आरडे, यांनी केली. .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.