सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील यांनी जरांगे पाटलांची घेतली भेट. आष्टी मतदारसंघात आले चर्चेला उधान...!

 सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील यांनी जरांगे पाटलांची घेतली भेट.
आष्टी मतदारसंघात आले चर्चेला उधान...!


-----------------



 

------------------



आष्टी (प्रतिनिधी) 

     शिव संघर्ष ग्रुप महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी तथा ज्येष्ठ पत्रकार सुरेश पाटील यांनी मराठायोध्दा मनोज जरांगे पाटील यांची अंतरवली-सराटी येथे भेट  घेतल्याने, आष्टी विधानसभा मतदासंघांत चर्चेला उधान आले आहे.





     राज्यातील विधानसभा निवडणुकांचे पडघम जसे जसे वाजु लागेल तसतसे आष्टी विधानसभा मतदार संघात मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील समर्थक तथा समाजसेवक सुरेश पाटील नावाची चर्चा अनेकांच्या तोंडी ऐकायला मिळत आहे. आष्टी/पाटोदा/शिरूर (का) हा बीड जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाचा व मोठा विधानसभा मतदार संघ मानला जातो, परंतु महत्त्वाचा जरी मतदार संघ असला, तरी या मतदार संघाचा विकास करण्यासाठी आजपर्यंतचे निवडूण दिलेले आमदार मात्र स्वतःचाच व नातेवाईकांचा विकास म्हणजे मतदार संघाचा विकास हेच ब्रिदवाक्य घेऊन काम करत आहेत. मात्र यंदाच्या निवडणुकी मध्ये मतदार राजा आता बराचसा सुज्ञ झालेला दिसुन येत आहे. कारण आताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत यांचा चांगलाच प्रत्यय आला आहे. वंशपरंपरागत राजकारण्यांच्या आणि घराणेशाहीच्या राजकारणाला सुरंग लावुन अबाधित समजल्या जाणाऱ्या सत्तेच्या माजाला याच मतदार संघाने सुरुंग लावण्याचे काम केलेले आहे. या विधानसभा निवडणुकीत आष्टी -पाटोदा - शिरूर मतदार संघात सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील हे निष्कलंक, उच्च शिक्षित उमेदवार आजपर्यंतच्या सत्ता भोगणाऱ्या आणि वंशपरंपरागत समजल्या जाणाऱ्या राजकारण्यांच्या सत्तेला सुरुंग लावुन सर्वसामान्य नागरिकांचा आमदार होऊन आमच्या आष्टी-पाटोदा- शिरूर मतदार संघाचा विकासाचा अनुशेष भरुन काढणार.! आमच्या तिन्ही तालुक्याला सुजलाम-सुफलाम करतील हा विश्वास आता दस्तुरखुद्द मतदार राजाला असल्यामुळे समाजसेवक सुरेश पाटील या नावाचा चर्चा जोर धरत आहे. शिव संघर्ष ग्रुप महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी तथा ज्येष्ठ पत्रकार सुरेश पाटील यंदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशी चर्चा गाव, शहर, वाडी वस्तीच्या पारावर चालू आहे. सध्या या मतदार संघातल्या मतदारांनी एका निश्चयाने मतदान करुन योग्य अशा शिक्षीत,अभ्यासु आणि तळागाळातील नागरिकांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या लोकप्रतिनिधीलाच निवडुन देणार असल्याचा निर्धार केल्यामुळे समाजसेवक तथा पत्रकार सुरेश पाटील यांचे नाव सध्या गाव,वाडी,वस्ती, आणी शहरी भागात चर्चीले जात आहे. सत्ता भोगुन आपल्याच झोळया भरुन जनतेला कंगाल करणाऱ्या व सत्तेच्या खुर्चीला आपल्या बापाची जहांगीरी समजणाऱ्या नेत्यांना यंदाच्या विधानसभेत त्यांची जागा दाखवुन देण्याची वेळ आता आली असुन,आता विकासाची दुरदृष्टी असलेल्या सुरेश पाटलांनाच मतदान देणार आणि विजयी सुध्दा करणार ! असल्याची चर्चा आष्टी-पाटोदा-शिरूर या मतदार संघातील जनतेत आतापासूनच सुरू आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.