माजी मंत्री सुरेश धस यांचे प्रयत्नातून आष्टी विधानसभा मतदारसंघातील.. ६१ कोटी २४ लक्ष रु. किंमतीच्या रस्ते कामांना मंजुरी..

 माजी मंत्री सुरेश धस यांचे प्रयत्नातून आष्टी विधानसभा मतदारसंघातील..
 ६१ कोटी २४ लक्ष रु. किंमतीच्या रस्ते कामांना मंजुरी..




  आष्टी (प्रतिनिधी)

 माजीमंत्री सुरेश धस यांनी आष्टी विधानसभा मतदारसंघातील वाड्या वस्त्यांवर दर्जेदार सिमेंट रस्ते व्हावेत.. यासाठी सतत विशेष प्रयत्न केले आहेत.. त्यांच्या या सततच्या पाठपुराव्यामुळे..आष्टी विधानसभा मतदार संघ क्षेत्रात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा -२ संशोधन व विकास (R&D)अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करण्यास ६१ कोटी १४ लक्ष रु.किमतीच्या सिमेंट रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली असून निधी उपलब्ध असल्यामुळे लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे

याबाबतची अधिक माहिती अशी की,महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री,एकनाथ शिंदे साहेब,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांचे माजी मंत्री सुरेश धस यांनी याबाबत विशेष आभार व्यक्त केले आहेत..

 आष्टी विधानसभा मतदारसंघात नव्याने मंजुर झालेले  रस्ते खालील प्रमाणे १)प्रजिमा-६४ आष्टा ते शिंदेवाडी रस्ता...३कोटी ८४ लक्ष 

२) राममा-५६१ ते आंधळयाची वाडी रस्ता...४ कोटी ०६ लक्ष

३) प्रजिमा-६५ सावरगाव ते पत्र्याचा तांडा रस्ता...३ कोटी  ३० लक्ष

४) प्रजिमा-०१ लोणी ते पोकळेवस्ती जिल्हा सरहद्द रस्ता...५ कोटी ०५ लक्ष

५) प्रजिमा-६४ मातकुळी ते डोकेवस्ती करेवडगाव रस्ता....४ कोटी ५६ लक्ष

६) राममा-५४८ ड ते सुरवसेवस्ती रस्ता.. २ कोटी ८९ लक्ष

७) रामा-७० ते तलवार प्रकल्प (खाडेवस्ती) रस्ता...५ कोटी ९१ लक्ष

८) प्रजिमा-६८ ते डागवस्ती रस्ता.....३ कोटी ५३ लक्ष

९) प्ररामा-१६ दौलावडगाव ते कोहक वस्ती रस्ता.... ४ कोटी ९२ लक्ष

१०) राममा-५६१ ते मुटकुळेवस्ती (मांडवा) रस्ता...५ कोटी ०३ लक्ष

११) प्रजिमा-५ मुगगाव ते गाडे/सुरवसेवस्ती (जोगदंडवाडी) रस्ता... ४ कोटी ८३ लक्ष

१२) राममा-५४८ ड, ते येवलवाडी (नागरगोजे) रस्ता....३ कोटी ८२ लक्ष

१३) प्ररामा-१६ डोंगरकिन्ही ते मुंजारवस्ती रस्ता....१ कोटी ३० लक्ष

१४) राममा-७५२ ई (शिरुर) ते थोरातवस्ती-ब्रम्हनाथ येळंब रस्ता....८ कोटी ०५ लक्ष याप्रमाणे आष्टी विधानसभा मतदारसंघातील विविध भागांमध्ये

एकुण : ६१ कोटी १४ लक्ष रु. किमतीच्या सिमेंट असे कामांना मंजुरी दिली आहे अशी माहिती सा.बा.विभाग स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी दिली आहे.या रस्त्याना मंजुरी मिळाल्यामुळे ग्रामीण भागातील रहदारी सुरळीत होऊन शेतकरी व्यापारी विद्यार्थी या सर्वांना या दर्जेदार रस्त्यांमुळे दळणवळणासाठी उपयोग होणार आहे याबाबत आष्टी विधानसभा मतदारसंघांमध्ये माजी राज्यमंत्री सुरेश धस यांचे जनतेतून कौतुक होत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.