उधारी मागितल्याच्या करणावरून टाकळी येथे डॉक्टर ला मारहान प्रकृती गंभीर

 *उधारी मागितल्याच्या करणावरून टाकळी येथे डॉक्टर ला मारहान,प्रकृती गंभीर*



टाकळी मानूर :- गुरुवारी साडे आठ वाजता टाकळी येथील संजीवनी क्लीनिक चे डॉ जितीन वंजारे यांना विशाल शिवाजी जायभाये आणी त्याचा भाऊ अंबादास शिवाजी जायभाये या दोघा भावांडाणी डॉ वंजारे यांना जबर हाणमार केली. डॉ जितीन वंजारे हे खालापूरी येथील रहिवाशी असून टाकळी येथे त्यांचं क्लीनिक आहे आणी ते टाकळी येथे वास्तव्यास असतात. त्यांचं छोटंसं क्लीनिक ते टाकळी येथे चालवतात गेल्या दीड महिनाची उधारी मागितल्याच्या करणावरून विशाल शिवाजी जायभाये आणी त्याचा भाऊ अंबादास शिवाजी जायभाये यांनी मिळून डॉ वंजारे यांना जातीयवाचक शिवीगाळ करून जबर मारहान केली, त्यांना प्रथम जीवे मरण्याची धमकी दिली, इथे दवाखाना टाकू नको बंद कर मी दवाखाना चालू देणार नाही, मला फुकट ट्रिटमेंट करायची एकही रुपया तुझा देणार नाही, परत पैसे मागितले तर जीवे मारिन अशी धमकी दिली, त्यानंतर महारड्या तुझी औकात नही मला पैसे मागण्याची तू महाराचा भडव्या तू औकातीत राहायचं महारड्या नी माजायचं नाही पैसे मागायचे नाहीत उलट फुकट ट्रीटमेंट करायची नसता येथून उठवून लावील आणी तुझ्या कुटुंबासाहीत जीवे मारिन अशी धमकी त्याने पैसे मागायला गेल्यावर सकाळी दिली, आणी रात्री साडे आठ च्या दरम्यान दवाखान्यात येऊन हुज्जत घालून मुदाम होऊन दादागिरी करून जीवे मरण्याची धमकी दिली आणी दोघं भावानी दवाखाण्यात यऊन डॉ वंजारे यांना बेदम अमानुष मारहान केली.यामध्ये मारायला आलेल्या दोघांकडून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट आणी दोन अंगठ्या ही हिसाकावून घेण्यात आल्या आणी हातातील घड्याळ ही तुटले.या गोष्टीमुळे टाकळी परिसरात हळहळ व्यक्त होत असून रात्री अपरात्री उठून वैद्यकीय सेवा देणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते डॉ जितीन वंजारे यांना मारहान करणाऱ्या गुंडावर तात्काल अटक करण्याची मागणी डॉ वंजारे यांच्या कुटुंबियांनी केली आहे. त्यांना मारहान होत असताना त्यांचा छोटा मुलगा राजरत्न हा तीथेच होता भांडण पाहून त्याला भीतिमुळे तो पायरी वरून खाली पडला त्याला चक्कर आली व पत्नी गरोदर असल्यामुळे खूप घाबरून गेल्यामुळे तिलाही चक्कर उलटी मळमळ चालू झाली.ह्या सर्व गोष्टीचा अति ताण झाल्यामुळे डॉ वंजारे यांची तब्बेत  नाजूक असून त्यांचा बीपी वाढला आहे उपाचारासाठी पाथर्डी व अहिल्यानगर/अहमदनगर येथील सरकारी दवाखान्यात त्यांच्यावर इलाज चालू आहेत. याबाबत पाथर्डी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.

*आजकाल माणुसकीने उधारीने उपचार करणं म्हणजे डॉक्टर च्या जीवितास धोका.मला वाचवा-डॉ जितीन वंजारे*

      *माणुसकीचे दर्शन घडवून रात्री अपरात्री स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांवर उपचार करून पैसे उधार ठेवणं म्हणजे स्वतःच्याच जीवाला धोक्यात घातल्यासारखं आहे हे आज कळलं.मी खुप रुग्णांना रात्री अपरात्री सेवा देतो, पैसे असो नसो उपचार करतो,शिबीर घेतो, मोफत औषधंपचार शिबीर घेतो, कोविड 19काळात कोरोनाची तमा न बाळगता मोफत आरोग्य सप्ताह आयोजीत केले,जिथे मुलगा बापाला हाथ लावत नव्हता माणुसकी संपली होती तिथे मी जीव धोक्यात घालून मोफत शिबिर घेतली औषध उपचार मोफत दिले,मला चार राज्य स्तरीय सामाजिक पुरस्कार मिळाले, कोव्हिड योध्दा झालो याच आज हे वाईट फळ मिळाले. मी सामाजिक कार्यकर्ता असल्या करणाने लोकांच्या सुखात कमी दुःखात जास्त सहभागी होतो, पैसे असले नसले तरी गोर गरीब रुग्णांवर उपचार करतो पण याच आज मला कटू फळ मिळालं माझी उधारी मागितल्याचा मनात राग धरून विशाल शिवाजी जायभाये आणी त्याचा भाऊ अंबादास शिवाजी जायभाये मोबाईल शॉपी वाले याने मला अमानुष मारहान केली हा अनुभव खूपच वाईट होता. मला माझ्या जातीवर हीनवल जातंय, माझी उपचार करताना उपभोग घेऊन पैसे द्यायच्या वेळेस जातीवाचक शिव्या देऊन मला मारहान केली जातेय, माझ्या अडीच वर्षाच्या लेकरासमोर मला अमानुष हाणमार होतेय ती फक्त उधारी मागितली म्हणून?  काय गुन्हा आहे माझा? मला न्याय हवा आहे. माझ्यावर हात उचलणाऱ्या  व जातीचा माज दाखवून मला धमाकावणाऱ्या, जातीवर शिवीगाळ करणाऱ्या, मला हीनवणाऱ्या,माझ्याकडून फुकट बळजबरी व दमदाटीने ट्रीटमेंट करून घेणाऱ्या  गाव गुंडाला जोपर्यंत शिक्षा होणार नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. सन्माननीय मुख्यमंत्री,गृहमंत्री,उपमुख्यमंत्री आणी आरोग्यमंत्री साहेबांनी यासर्वांनी याची दखल घेऊन मला न्याय द्यावा,माझी दोन महिन्यांची गरोदर बायको चे हाल मला पाहवत नाहीत,तिची आणि अडीच वर्षाच्या मुलाची हालत खराब आहे,घाबरले आहेत ते खूप त्यामुळे आम्हाला न्याय द्या  हीच नम्र विनंती. साहेब हे फक्त माझ्या सोबत घडत नही अशी अनेक डॉक्टर आहेत त्यांच्यासोबतही घडत आहे. आम्हाला संरक्षण द्या डॉक्टर प्रोटेक्शन ऍक्ट, एस सी एस टी ऍक्ट नुसार मला न्याय द्या साहेब. अशी मागणी डॉ जितीन वंजारे- (९९२२५४१०३० ) यांनी केली आहे .





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.