मच्छिंद्रनाथ देवस्थान हे भविष्यात जागतिक दर्जाचे होईल - मा. आ. भिमराव धोंडे
आष्टी प्रतिनिधी
मच्छिंद्रनाथ देवस्थान हे भविष्यात जागतिक दर्जाचे देवस्थान होईल असे प्रतिपादन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी आष्टी तालुक्यातील सावरगाव येथे केले. जनसंपर्क अभियाना दरम्यान सावरगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहास धोंडे यांनी भेट त्यावेळी बोलत होते याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड.साहेबराव म्हस्के, जि. प. सदस्य सुरेश माळी व इतर उपस्थित होते.
आष्टी विधानसभा मतदारसंघातील सर्व सामान्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी माजी आ. भीमराव धोंडे यांनी गुरुवारी दिनांक ८ ऑगस्ट रोजी जनसंपर्क अभियाना अंतर्गत आष्टी तालुक्यातील दौलावडगाव, मुळेवाडी, बांदखेल, केळ, पिंपळगाव,हरेवाडी, मराठवाडी, देऊळगाव घाट, शेडाळा, सावरगाव, शेंडगे वाडी या गावाचा दौरा केला. दौऱ्याच्या निमित्ताने माजी आ. भीमराव धोंडे यांचे ठिकठिकाणी वाजतगाजत व तोफा वाजवुन जोरदार स्वागत करण्यात आले. अभियानामध्ये माजी आमदार भीमराव धोंडे यांनी आतापर्यंत आष्टी, पाटोदा, कडा, शिरूर, धामणगाव, अंमळनेर , पिंपळवंडी, लोणी सय्यदमीर , पिंपळा, साकत, टाकळसिंग, हिंगणी, खडकत, वाळुंज, पारगाव व परिसरातील गावाचा दौरा केला. गुरूवारी झालेल्या दौऱ्याच्या निमित्ताने जि. प. सदस्य सुरेश माळी, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष साहेबराव म्हस्के,माजी सरपंच नंदू फसले, युवा नेते अभयराजे धोंडे, सरपंच भरत जाधव, देविदास मगर, सिताराम वाणी, अरुण क्षेत्रे, सरपंच शरद दळवी व इतर त्यांच्या सोबत होते. दौऱ्याच्या समारोप प्रसंगी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी मच्छिंद्रनाथ देवस्थान येथे जाऊन दर्शन घेतले.
सावरगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहामधील भाविकांसमोर बोलताना मा. आ. भिमराव धोंडे यांनी सांगितले की, नाथ संप्रदायाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात व देशातील लाखों भाविक पाडव्याच्या दिवशी मच्छिंद्रनाथांच्या दर्शनासाठी येतात. यावेळी ॲड . साहेबराव म्हस्के यांनी सांगितले की, हभप उंबरेकर महाराजांनी ३९ वर्षापुर्वी हा सप्ताह सुरू केला. पुर्वी गावात सतत भांडणे वाद होत होते. परंतु भिमराव धोंडे आमदार झाले आणि वकील झालो तेव्हा पासून गावातील वाद कमी झाले आहेत. अखंड हरिनाम सप्ताहामुळे लोकांवर चांगले संस्कार होतात व वाद कमी होण्यास मदत होते.
जनसंपर्क अभियानाच्या निमित्ताने पिंपळगाव येथे सिरसाट गल्लीत पेव्हिंग ब्लाॅक रस्त्याचे तसेच मराठवाडी येथील दत्त मंदीर परिसरात पेव्हिंग ब्लाॅक बसविणे उद्घाटन माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या हस्ते झाले.
केळ येथील पोलीस दलात निवड झालेल्या चंद्रशेखर कोहोक, वैभव दळवी तसेच देऊळगाव घाट कु. आरती राठोड हीची पोलिस खात्यात चालक म्हणून निवड झाली त्याबद्दल माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दौलावडगांव येथील जागृत देवस्थान हजरत सय्यद नसरुद्दीन शहा दर्ग्याचे दर्शन घेतले तसेच आयडीयल इंग्लिश स्कुलला सदिच्छा भेट दिली.दौला वडगाव ग्रामपंचायत कार्यालयात भेट दिली.
भारत इथापे यांनी कर्करोगावर मात केल्याबद्दल त्यांचा भिमराव धोंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.पिक विम्याबाबत काही शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीकडे नुकसान भरपाईची तक्रार केली अशा बोटावर मोजता येतील इतक्या शेतकऱ्यांनाच पिक विमा कंपनीने नुकसान भरपाई दिली. कंपनीने सरसकट शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केली. दौऱ्याच्या निमित्ताने बापु राऊत, शंकरराव कारभळ, बाबासाहेब कारभळ, मोहन पिसोरे, खाजाभाई, भाऊसाहेब दळवी, सुदाम पुंडे, मुकेश घाटविसावे, अरुण क्षेत्रे, एकनाथ दळवी, परशुराम मराठे, माजी सरपंच अशोक माळी, संतोष देशमुख, साहेबराव ठोंबरे, केशव आडसरे, शहादेव भगत, डॉ. वसंत म्हस्के यांच्या निवासस्थानी भेटी दिल्या
दादा कोहोक यांच्या मातोश्रीचे निधन झाले, इस्माईल खान यांचे निधन झाले,
कै. श्रीमती राबोबी शेख यांचे निधन झाले. कै. बबन उत्तम फसले यांचे निधन झाले. हरेवाडी येथील कै.पंढरीनाथ मराठे व दिपक दळवी यांचे निधन झाले. पिंपळगाव येथील गोरख लक्ष्मण दळवी यांचे निधन झाले
शेडाळा येथील कै. पांडुरंग लांडगे यांचे निधन झाले, दत्तु बापु शेंडगे यांच्या पत्नीचे निधन झाले या सर्वांच्या कुटुंबीयांचे भिमराव धोंडे यांनी घरी जाऊन सांत्वन केले.
कै. खंडू पिसोरे यांच्या दशक्रिया विधीस उपस्थित राहुन श्रद्धांजली अर्पण केली
जनसंपर्क अभियानात गावागावात सरपंच रामकिशन ठोंबरे, सरपंच भरत जाधव, सरपंच जावेद शेख,माजी सरपंच शेख महेमुद सुल्तान, सरपंच शरद दळवी, ग्रा. पं. सदस्य विठ्ठल फसले, रामदास फसले,ग्रा. पं. सदस्य बद्रिनाथ म्हस्के,मुख्याध्यापक महादेव दानवे, रघुनाथ कोहोक, हारुण मामू, जाधव गुरुजी,परसराम कदम, जैनउददीन मेजर, खंडू इथापे, सदाशिव गव्हाणे,कासम शेख, लिंबराज औटे मेजर, भिवा राऊत, अयुब खान, सिताराम जाधव, अरुण क्षेत्रे, शिवाजी दळवी, महादेव घाटविसावे, विजय शिंदे, देविदास मगर, अतुल जाधव, पोपट जाधव, सिताराम वाणी, रामदास दळवी,राहुल दळवी, मोहन कोहोक,
अर्जुन औटे, शंकरराव मराठे, रामदास औटे, पांडुरंग ओटे, खंडू औटे,
रावसाहेब दळवी,भाऊसाहेब दळवी, अशोक साधू दळवी, बबनदादा दळवी, श्रीकांत मैंद, विठ्ठल दळवी, तुकाराम दळवी,अजुन ढोले, श्रीकांत रासकर, दत्ता मेहेत्रे, अशोक घाटविसावे, मोहन शिंदे, राजु गिरी, अशोक कोरडे, संभाजी ठोंबरे, राजु राठोड, पोपट शिंदे, बाबासाहेब आडसरे, दिनकर वाघमारे, आडसरे महाराज, दादासाहेब शेंडगे, अशोक शेंडगे, अशोक ठेंगल, मारुती ठेंगल,लहानु ठेंगल, व इतर उपस्थित होते.
stay connected