आमदार Balasaheb Ajbe यांच्या पाठीशी उभे राहा बाकीचे मी पाहून घेतो त्याची काळजी तुम्ही करू नका - उपमुख्यमंत्री Ajit Pawar

 आमदार बाळासाहेब आजबे यांच्या पाठीशी उभे राहा बाकीचे मी पाहून घेतो त्याची काळजी तुम्ही करू नका - उपमुख्यमंत्री अजित दादा पवार





आष्टी प्रतिनिधी 

महाराष्ट्रात इथून पुढे विरोधकांकडून काहीही वावड्या उठवल्या जातील त्यावर विश्वास न ठेवता येणाऱ्या विधानसभेत महायुतीचे सरकार आणण्यासाठी आपण घड्याळ चिन्हा समोरील बटन दाबून महायुतीच्या उमेदवाराला विजयी करायचे आहे,तुम्ही कामाची चिकाटी असणारे कणखर आमदार बाळासाहेब आजबे यांच्या पाठीशी उभे राहा बाकीचे मी पाहून घेतो त्याची काळजी तुम्ही करू नका असे स्पष्ट विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी आष्टी येथे जन सन्मान यात्रेदरम्यान बोलताना केले.                         राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सुरू असलेली जनसन्मान यात्रा गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी दुपारी 01 वाजता आष्टी येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे महिला आयोगाचे अध्यक्ष रूपालीताई चाकणकर राज्याचे कृषिमंत्री तथा पालकमंत्री धनंजय जी मुंडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आष्टी मध्ये दाखल झाली यावेळी आमदार बाळासाहेब आजबे यांच्या वतीने जोरदार स्वागत करत भव्य अशा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये युवक महिला व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  मोरेश्वर लॉन्स येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले की आम्ही सरकारमध्ये आहोत  सामान्य जनतेसाठी सकाळी सात ते संध्याकाळी सात पर्यंत काम करतो सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन पुढे आपल्याला जायचं आहे आपण सर्वांमुळे वेगवेगळी पदे मी भूषवली आहेत तर आज आज उपमुख्यमंत्री आहे त्यामुळे आपल्या हातून चांगले काम कसे करता येईल यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असतो संपूर्ण समाज समाधानी झाला पाहिजे अशा योजना राज्यात राबवण्याचा नेहमी प्रयत्न करीत आहे त्यातूनच लाडकी बहीण योजना ,तीन सिलेंडर मोफत, मुलींना मोफत शिक्षण ,युवकांना प्रशिक्षण ,सात एचपी पर्यंतच्या पंपांना मोफत वीज पुरवठा, याचबरोबर सर्वात लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजना राबवण्याची संकल्पना ही आपण अर्थसंकल्पातून राज्यासमोर मांडली ही योजना विरोधक बंद पडणार आहे असे सांगत असले तरी तसे होणार नाही मी जे बोलतो ते करूनच दाखवतो पुन्हा महायुतीचे सरकार येण्यासाठी येणाऱ्या विधानसभेत आपण महायुतीच्या उमेदवारांना विजय  करण्यासाठी मतदान करायचे आहे राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यावर ही योजना पुढील पाच वर्ष  चालू राहणार आहे त्यामुळे आपण कसली काळजी करू नये अजितदादांचा शब्द म्हणजे शब्द असतो जे मी बोलतो ते मी करून दाखवतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने महिलांना सर्व क्षेत्रात संधी देण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही बिन कामाचे माणसे नाहीत आम्ही कारभार नीट करतो संस्था ही नीट चालवतो आर्थिक बाबतीत समाज समर्थ झाला पाहिजे यासाठी आमचे प्रयत्न असतात गोरगरिबांची लेकरे शिकले पाहिजेत म्हणून मुलींना मोफत शिक्षण केले आहे सर्व लाभार्थी महिलांना पैसे पडतील त्याच्यामुळे कोणीही काळजी करू नये बीडला कृषिमंत्री पद दिले आहे तुमचे कृषिमंत्री ही होतकरू आहेत त्यांचाही शेतीचा मोठा अभ्यास आहे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा एक रुपयात पिक विमा भरण्याची योजना राज्य सरकारने आणली त्यामध्ये एक कोटी 70 लाख रुपयांचा विमा भरला आहे सरकार तुमचे आहे आम्ही पण सर्व शेतकरी आहोत आम्हालाही शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आहे मी आजपर्यंत अनेक पदे उपभोगली आज मी तुमच्यामुळेच उपमुख्यमंत्री या पदावर आहे पदाचा वापर जर लोकांच्या कल्याणासाठी करता येत नसेल तर त्याचा उपयोग नाही आमच्या हातून लोक कल्याणकारी कामे व्हावीत हाच नेहमी आमचा प्रयत्न असतो महाराष्ट्रातील 50 लाख महिला या लखपतीदिदी करण्याचा संकल्प आम्ही केला आहे हे सरकार काम करणारे सरकार आहे कोरोना काळातही लोकांना मदत केली आहे जनतेच्या आशीर्वामुळे आष्टी पटोदा शिरूर मतदार संघात आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या माध्यमातून 2250 कोटी रुपयांचा निधी विकास कामासाठी आजपर्यंत आम्ही दिला आहे आमदार बाळासाहेब आजबे हे चिकाटीचे व आक्रमक आमदार आहेत काम करून घेण्याची जिद्द त्यांच्यामध्ये आहे त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात विकास निधी मतदारसंघासाठी त्यांनी खेचून आणला आहे यापुढेही तुम्ही आमदार बाळासाहेब आजबे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा बाकी सगळे माझ्यावर सोडा विरोधकांकडून अफवा पसरल्या जातील याची तिकीट कापले त्याचे तिकीट कापले हा उमेदवार आहे तो उमेदवार आहे असे काही होणार नाही मी आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्यामुळे तुम्ही कसलीही काळजी करू नका अशा स्पष्ट शब्दांमध्ये आमदार बाळासाहेब आजबे यांना अजित दादा पवार यांनी एक प्रकारे विधानसभेच्या उमेदवारीचे संकेत दिले. यावेळी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे बोलताना म्हणाले की महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्यांमध्ये वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा महायुतीचे सरकार येणार आहे कृषी विभागाच्या वतीने अनेक योजना सुरू आहेत त्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा जिथे अडचन येईल तेथे त्वरित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या व आमदार बाळासाहेब आजबे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा आम्ही शेतकरी व सर्वसामान्य जनतेसाठी कधीही कमी पडणार नाहीत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अजितदादा पवार यांनी राज्यांमध्ये सर्वांना न्याय देण्याचे काम केले आहे राज्यात लाडकी बहीण आता दादांवर विश्वास ठेवून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराला विजयी करणार आहे यात शंका नाही आमदार बाळासाहेब आजबे हे पोट तिडकीने मतदारसंघातील विकास कामासाठी आमच्याबरोबर भांडत असतात त्यामुळेच मतदारसंघात गेली साडेचार वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत आष्टी मतदार शिरूर मतदार संघाला विकास कामे करणारा व सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारे आमदार मिळाला आहे अशी शेवटी नामदार धनंजय मुंडे म्हणाले

यावेळी बोलताना आमदार बाळासाहेब आजबे यांनी मतदारसंघातील बंधारे तलाव विजेता प्रश्न यासारख्या शेतकऱ्यांशी निगडित समस्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासमोर मांडल्या तर येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात मतदारसंघांमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कृषी मंत्रीतथा पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामे करणार असल्याचे सांगितले या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे रूपालीताई चाकणकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण प्रदेश युवक अध्यक्ष सुरज चव्हाण माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर शिवाजी राऊत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आष्टी तालुका अध्यक्ष काकासाहेब शिंदे शिरूर तालुका अध्यक्ष विश्वास नागरगोजे दीपक दादा घुमरे पाटोदा तालुका अध्यक्ष सतीश आबा शिंदे विठ्ठल सानप दशरथ दादा वनवे धैरशील थोरवे भाऊसाहेब लटपटे युवराज झुंनगुरे महेश आजबे संग्राम आजबे यश भैया आजबे  माजी सभापती जयाताई गुंड  यांच्यासह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी गट गण प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिलांनी गर्दी केली होती कार्यक्रमांमध्ये सर्व महिलांनी गुलाबी फेटे बांधल्यामुळे एक प्रकारे गुलाबी वादळ या ठिकाणी असल्याचे पहावयास मिळाले मोठ्या संख्येने महिला शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित राहिले





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.