शेख महेबुब यांना लागणार आमदारकीची लॉटरी

 

शेख महेबुब यांना लागणार आमदारकीची लॉटरी



मुंबई (प्रतिनिधी):- नुकत्याच विधान परिषदेच्या सदस्यत्वाची मुदत संपल्याने आता महाराष्ट्र विधानसभा व विधान परिषदेत एकही मुस्लिम आमदार नाही. विशेषतः काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हमखास पाच-सहा मुस्लिम आमदारांना संधी मिळत असते. परंतू काही राष्ट्रवादी काँग्रेसचे मुस्लिम आमदार अजित पवार यांचेसोबत गेल्याने शरदचंद्र पवार यांच्या पक्षात एकही मुस्लिम आमदार राहिला नाही. त्यामुळे आणि सध्या पवार साहेबाकडे शेख महेबूब हा तरूण चेहरा प्रथम क्रमांकावर असल्यामुळे तसेच शेख महेबुब हे पक्षात अग्रभागी एकनिष्ठ राहून पक्ष वाढीसाठी अहोरात्र झटणारे तरूण नेतृत्व असल्यामुळे शरद पवार साहेब शेख महेबुब यांना विधानसभेला तिकीट देवून उभे करणार व निवडुणही आणणार असे खात्रीलयक वृत्त आहे. बीड जिल्ह्यात एक मुस्लिम उमेदवार देण्याची पवार साहेबांच्या विचाराधीन असल्याचेही वृत्त आहे.



 या बाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षफुटी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे तीनही मुस्लिम आमदार हसन मुश्रीफ, बाबाजानी दुर्रानी आणि नवाब मलिक हे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षासोबत गेले. त्या सर्वांना पवार साहेबांनीच आमदार बनविले होते. खरे म्हणजे पवार साहेब भविष्याच्या दृष्टीने तरूण चेहरे हेरूनत्यांना संधी देतात. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शेख महेबुब हे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थपणे नेतृत्व सांभाळत होते. पक्षफुटी नंतरही त्यांनी पवार साहेबांना सोडले नाही. एकनिष्ठ राहून राज्यात पक्षवाडीसाठी रात्रंदिवस काम करीत राहिले. कोणत्याही पदाची मागणी शेख महेबुब यांनी केली नाही. हे त्यांचे वैशिष्ट्य. परंतु अशा निःस्वार्थी, एकनिष्ठ कार्यकर्त्यांवर पवार साहेब कधीही अन्याय करीत नाहीत. योग्य वेळी संधी देवून त्याला न्याय मिळतोच. ती संधी आता शेख महेबुब यांना मिळणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. जर बीड जिल्ह्यातून शेख महेबुब यांना उमेदवारी दिल्यास आष्टी मतदार संघ हा त्यांचा होम पीच आहे. तर बीड मतदार संघ हा मुस्लिम बहुल मतदार संघ आहे. परंतू बीड येथे संदीप क्षीरसागर सारखा तरूण तडफदार चेहरा विद्यमान आमदार आहे. संदीप क्षीरसागर हे त्यांच्या आजी  केशरकाकू क्षीरसागर यांच्या सारखे जनतेत मिसळून काम करतात. काकू सारखेच संदीप हे जनतेतच लोकप्रिय आहेत. गुत्तेदार कार्यकर्ते काम मिळाले नाही म्हणुन इकडे-तिकडे उड्या मारतात, त्यांना संदीप यांनी जुमानले नाही. परंतू सतत लोकांमध्ये त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यामध्ये ते व्यस्त असल्यामुळे लोकप्रिय आहेत. त्यांची उमेदवारी पक्षाला डावलता येणार नाही म्हणुन शेख महेबुब यांना आष्टी मतदार संघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.