दिव्यांग कर्मचाऱ्यांना २०१६ पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू - लाड,साबळे

 दिव्यांग कर्मचाऱ्यांना २०१६ पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू - लाड,साबळे





---------------

आष्टी(प्रतिनिधी)राज्य शासनातील दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी ३० जून २०१६ पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू करण्याचा निर्णय दि.२३ जुलै २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.अशी माहिती शासन मान्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड,दिव्यांग क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते तथा पुरोगामी पत्रकार संघाचे आष्टी तालुकाध्यक्ष अध्यक्ष अण्णासाहेब साबळे यांनी दिव्यांग कर्मचारी हितार्थ दिली आहे. 

            बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.गट ड ते गट अ च्या पदांमध्ये पदोन्नतीमध्ये ४ टक्के आरक्षण ३० जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात येत आहे.याचा लाभ काल्पनिक पद्धतीने गट अ च्या निम्न स्तरापर्यंत मिळेल.३० जून २०१६ पासून ज्या दिनांकाला दिव्यांग अधिकारी किंवा कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र ठरेल त्या दिनांकापासून त्यांना काल्पनिकरित्या आरक्षणाचा लाभ देण्यात येईल.पदोन्नतीचा प्रत्यक्ष आर्थिक लाभ त्यांना प्रत्यक्षात पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून लागू होईल.या निर्णयामुळे पदोन्नती साखळीतील अंतर्गत ज्येष्ठतेवर परिणाम होण्याच्या शक्यतेमुळे गैरसोय टाळण्यासाठी ३० जून २०१६ नंतर मान्यता देण्यात आलेल्या प्रत्येक निवडसूचीतील पद संख्येनुसार आणि २० एप्रिल पक्ष २०२३ च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार प्रत्येक शासकीय आस्थापनेने दिव्यांग आरक्षणाची गणणा करावी.तसेच पात्र दिव्यांगांची संख्या पुरेशी नसल्यास अधिसंख्य पद निर्माण करावे असे देखील ठरले.दिव्यांग कर्मचाऱ्यांना २०१६ पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे शेवटी राजेंद्र लाड, अण्णासाहेब साबळे यांनी आभार व्यक्त केले आहेत.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.