आष्टी तालुक्यात दररोज होणाऱ्या पावसाने खरिपाची पिके धोक्यात १० ते १२ दिवसांपासून सूर्यदर्शन नाही

 आष्टी तालुक्यात दररोज होणाऱ्या पावसाने खरिपाची पिके धोक्यात
१० ते १२ दिवसांपासून सूर्यदर्शन नाही 






आष्टी प्रतिनिधी - तालुक्यात मागिल १० ते १२ दिवसांपासून दररोज पाऊस कोसळत असल्याने शेतात पाणी साचून खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. बुधवारी रात्रीपासून काल पहाटे व दिवसभर रात्रभर व आज दि.२५ जुलै रोजी ही पहाटेपासून तालुक्यात रिमझिम पाऊस सुरू आहे.मागिल काही दिवसांपासून सूर्यदर्शन देखील झाले नाही.या पावसाने खरीप हंगामातील उडीद,तुर, सोयाबीन,कांदा,बाजरी या पिकांचे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून वाहनधारकांना ही लाईट लावून प्रवास करावा लागत आहे.


आष्टी तालुक्यात अनेक ठिकाणी मागिल काही दिवसांपासून रिमझिम पाऊस कोसळत आहे.शेतकऱ्यांना यंदाचा खरीप हंगाम पदरात पडेल, अशी अपेक्षा होती. मात्र अति पावसाने हातचे पीक वाया जात असल्याचे शेतकऱ्यांना पाहावे लागत आहे.मागिल १० ते १२ दिवसांपासून रोज पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सखल भागात अति पावसाने शेतांमध्ये पाणी उफाळून आल्याने पिके पाण्याखाली गेली आहेत. पाणी साचून चिखल व पाण्यामुळे बहरलेल्या पिकांची मुळे सडून पिके वाया गेली आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनी कापूस, बाजरी, तूर, मूग, उडीद,आदी पिकांची पेरणी व लागवड मोठ्या प्रमाणात केली होती. जूनच्या सुरुवातीला व त्यानंतर झालेल्या पावसाने पिके बहारदार उगवून आली होती. मात्र दररोज होणाऱ्या पावसाने पीक वाया जाऊन मशागत, बी-बियाणांसाठी केलेली मेहनत व खर्च वाया गेला आहे.पाणी साचून राहिल्याने शिवार जलमय झाला आहे. परिणामी शेकडो हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. अजूनही परिसरात पाऊस होत आहे. त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

________

पावसाने धान पिवळी पडली,पाणी साचून कुजली शेतकऱ्यांवर पाळी घालण्याची वेळ ७५ टक्के पिक वाया गेले 


मागिल २ आठवड्यापासून दररोज होणाऱ्या पावसाने मोठ्या प्रमाणात शेतात पाणी साचून पिकांची मुळे कुजली आहेत. अगोदर २५ टक्के पिक हुंगणी लागून गेले,आता ही मुळ कुजल्याने ५० टक्के पिके आत्ताच वाया गेली आता पाळी घातल्याशिवाय पर्याय नाही कुठतरी एक एक ठोंब राहिला आहे.कांदे इरले,पिकांची वाढ खुंटली व दररोज च्या पावसाने धान पिवळी पडली आहेत.त्यामुळे मोठे नुकसान झाले असल्याचे शेतकरी संतोष टकले यांनी सांगितले.

________

नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी अॅपच्या माध्यमातून विमा कंपनीनेकडे तक्रार नोंदवावी 


सध्या सातत्याने कोसळत असलेल्या पावसाने पिकांमध्ये पाणी साचले आहे.शेतकऱ्यांनी शेतातील जास्तीचे पाणी काढून द्यावे तसेच पिकाचे नुकसान झाले असल्यास पीक विमा कंपनी ला क्रॉप इन्शुरन्स या अँप च्या माध्यमातून माहिती द्यावी आपली तक्रार नोंदवावी जेणेकरून आपल्याला नुकसानीचा विमा मिळण्यास मदत होईल,पाऊस उघडताच कीटकनाशक, बुरशीनाशक व त्यासोबत विद्राव्य खतांची फवारणी करावी- गोरख तरटे 

( तालुका कृषी अधिकारी,आष्टी )




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.