सौ.प्रतिमा काळे यांचा वाढदिवस माई बालभवनमध्ये भर पावसात कवितांच्या पावसात साजरा
पुणे:- शिक्षिका, कवयित्री ,लेखिका,निवेदिका, सामाजिक कार्यकर्ता सौ.प्रतिमा काळे यांचा वाढदिवस माई बालभवनमध्ये भर पावसात कवितांच्या पावसात साजरा.
माई बालभवन आश्रम,मामुर्डी येथे सोमवार दिनांक २९ जुलै २०२४ रोजी सौ.प्रतिमा काळे यांचा वाढदिवस साहित्यिक वारकऱ्यांनी मिळून साजरा केला.त्यात धम्माल केली,कवितांचा पाऊसच पाडला.त्यात सर्व ओलेचिंब भिजले.छोटासा केक कापून अन् फुल न फुलाची पाकळी म्हणून थोडासा खारीचा वाटा म्हणून आर्थिक मदत करून वाढदिवस साजरा केला.लहान-मोठ्या प्रत्येक वयोगटातील अनाथ अंध मुलींसोबत आनंद साजरा केला.या प्रसंगी कवी धनंजय इंगळे,कवी अशोक वाघमारे,
कवयित्री सौ.रेवती साळुंके यांनी आपल्या कविता साजऱ्या केल्या.तसेच मनोगत ही व्यक्त केले.
या कार्यक्रमात सहभागी झालेल्या कवी कवयित्रींचे माई बाल भवन चे संचालक श्री.मनोहर इंगळे सर यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.सरांनी एक छोटी इच्छा व्यक्त केली तेथील ही मुलींना काव्य सादरीकरण साठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे.त्यांच्या ही कवितांचे पुस्तक निघावे.त्यांना आम्ही आश्वासन दिले की नक्कीच त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देवू.
आपण समाजाचे देणे लागतो,निसर्गाचे देणे लागतो आणि त्यासाठी अशा वृद्धाश्रम,बालाश्रम,अनाथाश्रम,मूकबधीर शाळा,यांच्यासोबत राहून आनंदाचा क्षण साजरे करावे असे आवाहन सौ.प्रतिमा काळे,श्री. धनजंय इंगळे सर,सौ.रेवती साळुंखे यांनी व्यक्त केले.तो जो आनंद आहे म्हणण्यापेक्षा मानसिक समाधान आहे,ते कोठून च विकत घेता येत नाही.जे जे आपल्या जवळ आहे,ते ते देतची जावे..अन् पुढे पुढे चालावे.आपण सुख दिले तर नक्कीच आपल्याला सुख मिळते..ते समाधान जितके महत्त्वाचे असते ते खूप अतुलनीय आहे.
stay connected