आष्टी तालुक्यात दोन ठिकाणी वीज कोसळली , दोघांचा मृत्यू
आष्टी ( प्रतिनिधी ) - आष्टी तालुक्यात शुक्रवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यावेळी विजांचा कडकडाट सुरू होता . त्यात दोन ठिकाणी वीज पडली . रुई , हनुमंतगाव येथे वीज पडल्याने दोघांचा मृत्यू झाला. आष्टी तालुक्यात शुक्रवारी हनुमंतगाव येथे सायंकाळी पाच वाजता वीज पडून एका वृद्धेचा मृत्यू झाला. हनुमंतगाव येथील शांताबाई बापू खेमगर ही महिला शेतात मळणी साठी काढून वाळत टाकलेला गहू गोळा करत असताना पाऊस आला . पावसापासून बचावासाठी ती महिला झाडाखाली गेली. त्याचवेळी वीज पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला . रुईनालकोल येथे ऊसतोड कामगार ऊस तोडत असताना त्याच्या अंगावर विज पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार दिनांक 29 रोजी दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास घडली .
आनंद सुरेश सोनवणे वय 22 राहणार नांदखुर्द तालुका एरंडोल जिल्हा जळगाव असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तिन्ही घटना शुक्रवारी संध्याकाळी घडल्या.
stay connected