धक्कादायक ! विवाहीत महीलेवर अत्याचार : अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ; एकास अटक

 धक्कादायक ! विवाहीत महीलेवर अत्याचार : अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ; एकास अटक

----------------------------------



चारचाकी गाडीतच बळजबरीने संबंध ठेवले असल्याची धक्कादायक माहीती समोर आली आहे.


आष्टी/प्रतिनिधी

आष्टी तालुक्यातील एका गावातील विवाहीत महीलेवर  योगेश बलभिम गाडे याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना अंभोरा पोलिस ठाणे अंतर्गत घडली आहे.

मिळालेली माहिती अशी की, आरोपी योगेश बलभिम गाडे यांच्याकडे मुकादमकी आहे. पिडीत महीला आरोपींकडे गेली तीन चार वर्षांपासून ऊसतोडणीच्या कामाला असल्याने आरोपी योगेश गाडे हा कायमच पिडीत महीलेकडे वेगळ्या नजरेने पाहत असत. पिडीत महीलेच्या पतीचे किरकोळ कारणावरून वाद असल्याने पिडीत महीला तीच्या आईवडीलांसोबत माहेरी राहत असत. 



अंभोरा पोलीस ठाण्यात पिडीतेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की

आरोपीने तुझ्याकडे माझे पैसे शिल्लक आहे असे म्हणत बळजबरीने ॲग्रो कारखाना बारामती येथे नेऊन तिच्यावर स्कॉर्पिओ गाडीतच बालात्कार केला.त्यानंतर आरोपीने मला स्वतः ची पत्नी असल्यासारखे समजू लागला.परंतु मी प्रेगनेंट राहीलेली त्याला समजताच त्याने गर्भ खाली करण्याचा सल्ला दिला.परंतु मी नकार देत असता त्याने आरोपी बाळु शिंगोटे व लखन देसाई  यांच्या मदतीने मला गर्भ खाली करण्याच्या गोळ्या जेवनातुन खाऊ घातल्या.त्यामुळे माझा गर्भ खाली झाला.त्यानंतर आरोपी योगेश गाडे यांचा भाऊ संपत गाडे मला भेटला व घडलेली हकीकत कोणाला सांगू नको अशी धमकी दिली. असे पिडीतेने फिर्यादीत म्हटले आहे .



त्यानंतर घडलेली सर्व हकीकत पिडीतेने आईवडीलांना सांगितली असता सरळ अंभोरा पोलिस ठाणे गाठले व आरोपी योगेश गाडे यांच्यासह आरोपी बाळु शिंगोटे,लखन देसाई व संपत गाडे विरोधात कलम३७६,३३६,३१३,५०६,३४ सह ॲट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत २७ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल झाला आहे. यामधील एक आरोपी अटक असून उर्वरित आरोपींचा शोध सुरु आहे.पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी (DYSP)अभिजित धाराशिवकर करत आहेत.














टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.