काम दमदार पण प्रसिद्धीपासून लांब...
विविध क्षेत्रातील महिलांची फिनिक्स गगनभरारी
जागतिक महिला दिनानिमित्त युवा पत्रकार संघ राज्यस्तरीय पुरस्कार देऊन करणार सन्मान
महीलादिन विशेष...
आष्टी प्रतिनिधी - समाजात काम करत असताना आपलं काम अन् आपण असा मनात निश्चय करून गेल्या अनेक वर्षापासून कुठलीही अपेक्षा न करता आपल्या क्षेत्रात दमदारपणे काम करून फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशात गगनभरारी घेऊन आपल्या कर्तत्वचा ठसा उमटविला. एक महिला असून ही आपले एक वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या आष्टी तालुक्यातील जिगरबाज व कर्तृत्ववान महिलांचा शनिवार दिनांक ९ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त आष्टी पंचायत समिती येथील सभागृहात सकाळी ११ वाजता आष्टी तालुका युवा पत्रकार संघ राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव व सन्मान करणार आहे. या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याला उपस्थित रहावे असे आवाहन आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
देशभरात विविध क्षेत्रात काम करून महिला नेहमीच पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून 'हम भी किसीसे कम नही' हे अनेक वेळा महिलांनी आपल्या कर्तृत्वाने दाखवून दिले आहे. महिला ही जगात प्रत्येक क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहेत मग ते क्षेत्र राजकीय असो किंवा शैक्षणिक औद्योगिक असो किवा प्रशासकीय असो शेतीशी निगडीत असो. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. अशाच काही महिलांचा ज्या प्रसिद्धीपासून कोसो दूर राहून पडद्या मागची भूमिका दमदार पणे पार पाडत आहेत.
_________
*"राज्यस्तरीय नारी सन्मान पुरस्काराने (2024) यांचा होणार सन्मान*
बनसोडे जनाबाई आनंदराव (आदर्श माता पुरस्कार), शुभदा घोगरे/चव्हाण पोलीस उपाधीक्षक मुंबई (आदर्श महिला पोलीस अधिकारी पुरस्कार), विजया गंगाधर घुले (केळसांगवी) (उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार), सीमा दिगंबर वालेवाडीकर/ कांबळे (आदर्श प्राचार्य पुरस्कार), डॉ. प्रियंका सिंघन (आदर्श वैद्यकीय अधिकारी पुरस्कार), श्रीमती गाढवे संजना रावसाहेब धामणगाव (आदर्श महिला सरपंच पुरस्कार), प्रा. डॉ. काझी तनवीर बेगम हाफिजोदिन (आदर्श प्राध्यापिका पुरस्कार), भोपळे सुनीता श्रीधरराव (आदर्श आरोग्य सेविका पुरस्कार), गायकवाड सोनल शिवलाल (आदर्श तलाठी पुरस्कार), एड. सय्यद अतीया ताहेर (आदर्श विधिज्ञ पुरस्कार), पगारे शोभा/ निकाळजे (आदर्श आशावर्कर पुरस्कार), पोकळे दिपाली हरिभाऊ (आदर्श कृषी सहाय्यक पुरस्कार), खान यास्मिन (दौलावडगाव,आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार), थोरवे सुनिता भानुदास (आदर्श गटप्रवर्तक पुरस्कार), चव्हाण विद्याताई संतोष (आदर्श महिला सामाजिक कार्य पुरस्कार), उषा जगदाळे (उत्कृष्ट तंत्रज्ञ पुरस्कार), म्हसोबा महिला शेतकरी गट (आदर्श महिला शेतकरी गट पुरस्कार), निशा आदक (आदर्श शिक्षिका पुरस्कार), सुजाता देवराव जाधव, खिलारे वंदना नवनाथ (आदर्श महिला वाहनचालक पुरस्कार), नंदाताई पांडुळे नगर (आदर्श प्रशिक्षक केंद्र संचालिका पुरस्कार), पत्रकार गीतांजली लव्हाळे वडवणी (आदर्श महिला पत्रकार पुरस्कार), रोहिणी रमाकांत पोतदार (आदर्श दिव्यांग समाजकार्य पुरस्कार) यांचा शनिवार दि.९ मार्च रोजी आष्टी पंचायत समिती सभागृहात महीला दिनानिमित्ताने शाल श्रीफळ सन्मानपत्र स्मृतिचिन्ह व फेटा बांधून 'नारी सन्मान २०२४' हा पुरस्कार देऊन आष्टी तालुका युवा पञकार संघ गौरव करणार आहे. या पुरस्कार सोहळ्याला प्राजक्ताताई सुरेश धस दमयंती ताई भीमराव धोंडे सविताताई बाळासाहेब आजबे, प्रमोद कुदळे उपविभागीय अधिकारी पाटोदा, बाळदत्त मोरे तहसीलदार आष्टी, शुभदा घोगरे /चव्हाण पोलीस उपाधीक्षक मुंबई, राजेंद्र गर्जे गटविकास अधिकारी आष्टी, डॉ. जयश्री शिंदे तालुका आरोग्य अधिकारी आष्टी, अंजली वाघमारे एकात्मिक बाल विकास अधिकारी आष्टी, सुधाकर यादव गटशिक्षण अधिकारी आष्टी, संतोष खेतमाळस पोलीस निरीक्षक आष्टी, डॉ राहुल टेकाळे अधीक्षक ग्रामीण रुग्णालय आष्टी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या सोहळ्याला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आष्टी तालुका युवा पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.



stay connected