MUMBAI | आमच्याकडे पैसे नाहीत पण लोकांचे समर्थन आहे - संजय राऊत

 MUMBAI | आमच्याकडे पैसे नाहीत पण लोकांचे समर्थन आहे - संजय राऊत

Sanjay Raut Live

पत्रकार परिषदेतील हायलाईटस

शेतकरी आंदोलन

- मग यावर महाराष्ट्रात प्रश्न विचारण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रधानमंत्री, कृषिमंत्री हे असतील, त्यांना हे प्रश्न विचारले पाहिजे.

- शेतकऱ्यांना अटक करण्यासाठी जेलची उभारणी करू शकतात, रस्त्यावर बंदूक घेऊन हजारो पोलीस तुम्ही थांबवू शकता, अडथळे निर्माण करण्यासाठी तुम्ही खेळू शकता, पण पाचशे कोटी रुपयांच नुकसान होत आहे, त्या संदर्भात सरकार हे प्रकरण गांभीर्याने हाताळण्यास तयार नाही.

- काय करत आहेत मोदी देशात? अबुधाबीला घंटा वाजवत फिरत आहेत, लोकांना मूर्ख बनवत आहेत.

- हा प्रश्न तुम्ही भारतीय जनता पक्षाला विचारला पाहिजे.


अदाणी डेव्हलपमेंट

- गौतम अदानी आणि भारतीय जनता पक्ष वेगळे नाही.

- इलेक्ट्रॉनचा जो विषय सुप्रीम कोर्टाने फटकार लावली आहे, ज्यांनी इलेक्ट्रॉन विकत घेऊन भारतीय जनता पक्षाची तिजोरी भरली आहे, ते नाव जाहीर करा. याची सूचना आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामध्ये अदाणी यांचं नाव सर्वात वर आहे.

- अशा प्रकारचे ठेके द्यायचे उद्योगपतींना आणि त्या बदल्यात शेकडो इलेक्ट्रॉल बॉण्ड विकत घ्यायचे, निवडणूक निधी म्हणून हा भारतीय जनता पक्षाचा गोरख धंदा आहे. 

- हजारो कोटी रुपये त्यांच्या तिजोरीत जमा आहेत. आमच्या पक्षाकडे नाहीत, काँग्रेसकडे देखील नसावेत, राष्ट्रवादी काँग्रेसकडे देखील नसावेत, पण त्यांच्याकडे आहेत. 

- मुंबईचं नाव उद्या बदलून अडाणी नगर केलं, तर 106 हुतात्मे यांनी मुंबईसाठी हुतात्मे दिले आहेत त्यांना स्वर्गात पुन्हा एकदा आत्महत्या करावी लागेल आणि हुतात्मा पत्करावा लागेल.

- काय करत आहेत एकनाथ शिंदे? महाराष्ट्र स्वाभिमानी हिंदुत्व रक्षक काय करत आहेत? कोल्हापुरात बसून आखी मुंबई एका उद्योगपतींच्या घशात चालली आहे आणि त्या मुंबईवरचा मराठी ठसा पुसला जात आहे. 


ON भाजप

- भारतीय जनता पक्षामुळे राज्याची संस्कृती पूर्णपणे बिघडली आहे. 

- भारतीय जनता पक्षाने काही टोळ्या हायर केल्या आहेत, भाड्याने घेतल्या आहेत.

- आणि या महाराष्ट्रात एक थोर परंपरा होती, पुरोगामी महाराष्ट्राला एक राजकीय संस्कृती होती, यशवंतराव चव्हाण यांच्यापासून आतापर्यंत त्या संस्कृतीवर दारूच्या आणि त्याच्या गुळण्या टाकण्याचं काम ते भारतीय जनता पक्षाने काही भाडोत्री लोकांकडून सुरू केले असेल.

- आम्ही सुद्धा कठोर शब्दाचा वापर करतो. बाळासाहेब ठाकरे देखील नक्कीच करायचे. अनेक कठोर शब्द आम्ही वापरले. आमच्याकडून एक दुसरा शब्द चुकीचाही जात असेल, पण ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षांना हा जो दारूखाना सुरू केला आहे, या ज्या भट्ट्या नशेच्या लावल्या आहेत, त्या पाहता महाराष्ट्राची संस्कृती लयाला जात आहे. 

- मी कोणत्या व्यक्तीचे नाव घेत नाही. 


ON काँग्रेस 

- अजिबात फटका बसणार नाही.

- आमच्याकडे पैसे नाहीत पण लोकांचे समर्थन आहे.

- आमचे तुम्ही पैसे काढून घ्या. पण लोकांचे समर्थन कसे काढून घ्याल?











टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.