आप युवा आघाडी ने छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी



 *आप युवा आघाडी ने छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी*




आप युवा आघाडी अमरावती महानगर तर्फे नागेश लोणारे अध्यक्ष आप युवा आघाडी यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हाराअर्पण करून अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज की जय जयघोष करीत व पेढे वाटप करूण  फर्शी स्टाॅप दस्तुर नगर अमरावती येथे जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. प्रविण काकड, महेश देशमुख, नागेश लोणारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी संबोधित व सर्व नागरिकांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी अमरावती तालुकाध्यक्ष ओमसिंग शेखावत, महिला संघटन मंत्री रेखा हजारे, युवा सचिव नितीन नवले, उपाध्यक्ष सतिश दुबे, डॉ भारती जाधव, मयुरी लोणारे, वृषाली लोणारे, प्रमोद कुचे, आशिष अंबुलकर, राजेश मरसकोल्हे, संजय राऊत, राजेन्द्र वानखडे, रामेश्वर स्वर्गे, आकाश मेश्राम, मनोहर वानखडे, संदिप जगनाडे, राजेश तासकर, महेंद्र विघ्ने, कैलास जयसिंगपूरे, डॉ भूषण घुले, दिलीप पाटील, मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.