Manoj Jarange Patil सह लाखो मराठा बांधवांची बाराबाभळी मदरसा येथे मुस्लिम बांधवांनी केली राहण्याची व्यवस्था

 Manoj Jarange Patil सह लाखो मराठा बांधवांची बाराबाभळी मदरसा येथे मुस्लिम बांधवांनी केली राहण्याची व्यवस्था



मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे निघालेली पदयात्रा रविवारी (२१ जानेवारी) अहमदनगरमध्ये आली होती. या पदयात्रेच्या रात्रीचा मुक्काम बाराबाभळी येथे होता.

कौतुकास्पद म्हणजे मराठा समाजच्या मुक्कामाच्या व्यवस्थेसाठी मुस्लीम समाजाने मदरशाच्या ८५ एकर जागा दिली होती. सामाजिक एकतेचा अनोखा संदेश याद्वारे समाजात पोहोचला आहे.


बाराबाभळी येथे दीडशे एकरवर मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यापैकी ८५ एकर जागा ही मदरशाची आहे. जागा उपलब्ध करून देण्यासोबतच मदरशातील साडेतीनशे विद्यार्थ्यांनीही मराठा बांधवांची सेवा केली.

याशिवाय परिसरात भगवे झेंडे लावण्यासाठीही परवानगी देण्यात आली होती. मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील व त्यांना साथ देणाऱ्या सर्वांचे जामिया मुहम्मदीया मदरसा यांच्यातर्फे स्वागत करणारा फलकही लावण्यात आला होता.

बाराबाभळी येथील मदरशातच मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी रात्रीचा मुक्काम केला. पदयात्रेत महिलाही सहभागी आहेत. बाहेर थंडी असल्याने मदरशातील वसतिगृहामध्ये एक हजार महिलांची झोपण्याची व्यवस्था केली गेली होती.


रविवारी रात्री मराठा बांधवांनी याच मैदानावर भोजनही घेतले. मदरशातील विद्यार्थ्यांनी मनोभावे सेवा दिली.

मनोज जरांगे पाटील व सर्व मराठा समाज बांधवांची अत्यंत व्यवस्थित अशी सोय मदरशामध्ये करण्यात आली होती. एकतेचा, सामाजिक एकोप्याचा संदेश यावेळी संपूर्ण राज्यात पोहोचला आहे. यावेळी मनोज जरांगे यांना मदरशाच्या विश्वस्तांनी मराठी कुराणची प्रत भेट दिली. मुस्लिम बांधवांनी मोठ्या ताकतीने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा दर्शवला असुन राज्यभरात ठिकठीकाणी मुस्लिम बांधव मराठा बांधवांच्या मदतीस व सेवेसाठी धावून येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे . मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील मराठा व मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडत आहे . मराठा बांधवांची ही पदयात्रा मुंबईच्या दिशेने सरकत असून लाखोंच्या संखेने मराठा बांधव या यात्रेत राज्यभरातून येत आहेत .









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.