अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून भरपाई द्या- रवीकाका ढोबळे

 अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून भरपाई द्या- रवीकाका ढोबळे

----------------------------------




आष्टी/प्रतिनिधी

तालुक्यात दोन दिवस अवकाळी पाऊस पडल्याने अनेक शेतकऱ्यांना त्याचा फटका सहन करावा लागला, काही दिवसापूर्वीच परिसरात रब्बी हंगामाला सुरुवात झाली होती.

अचानक आलेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले, पिके भुईसपाट झाले. हातातोंडाशी आलेला घास अस्मानी संकटाने हिरावून घेतल्याचे चित्र दिसत आहे. वातावरणात सकाळपासूनच प्रखंड उकाडा जाणवत होता, विजांचा कडकडाटासह दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास अचानक पावसाने अक्षरशः झोडपून काढले. पावसामुळे काढणीला आलेला कांदा, ज्वारी, कापूस, हरभरा, पिकांना  पावसाचा तडाखा बसल्याने  पिके जमीनदोस्त झाली.

यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने ते हवालदिल झाले आहेत, तरी तालुक्यातील पिकांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई करा अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष रविकाका ढोबळे यांनी तहसिलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनावर अनेक पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.