कांदा पिक व कांदा दरा विषयी कृषीभूषण बाबासाहेब पिसोरे यांचे शेतकऱ्यांना अभ्यासपूर्ण मार्गदर्शन
शेतकरी बांधवांनो नमस्कार,
मी बाबासाहेब पिसोरे कृषीभूषण महारष्ट्र राज्य, कांदा उत्पादक व निर्यातदार शेतकरी.
मित्राहो मी या पत्रकाव्दारे आपणास सांगु इच्छितो की, गेली दोन दिवस अनेक शेतकऱ्याचे कांदा पिका बद्दल आणि विशेष म्हणजे कांदा दरा बद्दल सारखी विचारण होत आहे.
विषय असा असतो, आज सर्वत्र कांदा 80 रू भावाने विकला जात आहे हे भाव किती दिवस टीकतील? केंद्र सरकारणे यापूर्वी 40 % निर्यात शुल्क अकारले आहे. आणि काल मध्यरात्री परत 800 अमेरिकन डॉलर MEP (मिनीमम एस्पोर्ट पाईज) वाढवले आहे. म्हणजे 800 X 94 =67200 आणि इतर टॅक्स जोडला तर एका टनाला 70.000/- रूपये अगोदर सरकारला टॅक्स पेड करावा लागतो मगच कांदा खरेदी करायचा. आता अशा वेळी कुठलाही देश तुमचा कांदा खरेदी करणार नाही अर्थात हि निर्यात बंदीच म्हणावी लागेल त्यामुळे निर्यातदार व आयातदार यांचे करार तुटले दोघाचे अति नुकसान झाले याचे सरकारला देणे-घेणे नाही.
आता केंद्र सरकार म्हणते, आम्ही 4 लाख टन कांदा खरेदी केलेला आहे आणि तो 25 रूपये किलो दराने विकत आहोत. या निव्वळ थापा बाजी आहे. त्यानी जरी कांदा खरेदी केलेला असता तरी तो आज नक्कीच नाही आणि असेल तर सुस्थित नाही तेव्हा थोडाफार कांदा शेतकरी बांधवाकडे कांदा चाळीत आहे त्यांचे पुढे अनेक प्रश्न उभे आहे. सरकारने दाखवलेल्या भिती मुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तेव्हा यासर्व विषयाला अनुसरून मी आपणा समोर मला जे वाटते ते मांडण्याचा प्रयन्त करत आहे.
पहिला प्रश्न कांद्याचे भाव गडगडतील का? तर मित्रहो नक्कीच भाव कमी होणार नाहीत. कांदा दिवाळी पर्यंत शंभरी गाठेल यांची मला खात्री आहे. याचे कारण असे आहे की, सरकारणे जरी शेतकऱ्या विरूध्दात कठोर पाऊल उचलले असले तरी त्यांचा काहीही उपयोग होणार नाही. निर्यात पुर्ण पणे बंद झालेली असली तरी देशा अतंगत रोज 55 ते 60 हजार टन कांदा खाण्यासाठी लागतो. बाकी प्रक्रीया उद्योग वेगळे.
आता सरकार म्हणते, 4 लाख टन कांदा खरेदी केलेला आहे. असेलही त्याबद्दल खोलात जायला नको, पंरतु तुमचा 4 लाख टनातील आज रोजी किती सडला, किती विकला व आज किती शिल्लक आहे याची सरकारने आकडेवारी सांगावी सरकार म्हणते 25 रू दराने कांदा आम्ही जनतेला देत आहोत. कृपया आता पर्यंत कोठे व आणि कोणाला दिला यांचा खुलासा करावा. निव्वळ आमची दिशाभुल करण्याचा प्रयन्त होत आहे. आपण सरकारचे सर्व म्हणने खरे समजु पंरतु जर देशात 55 ते60 हजार टन कांदा खाण्यासाठी लागतो तर त्याचा कांदा 4 दिवसात संपेल मग पुढे काय?
माझ्या माहिती प्रमाणे सरकारने काही कांदा कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवलेला आहे, ते ऐवढा आहे कि देशाची 150 कोटी जनता एका जेवनात संपुन टाकेल. तेव्हा हा निव्वळ दिशाभुल आणि खोटाडेपणा आहे.
कांदा उत्पादक शेतकरी मित्रोहो घाबरण्याचे आजीबात कारण नाही. मी रोज शेतकऱ्याना सांगत आहे, ज्याच्या कडे पाणी उपलब्ध आहे त्यांनी जरूर उन्हाळी (रबी) कांदा लागवड करावी कारण कमीत कमी 1 वर्ष कांदा दर कमी होणार नाहीत. आजुनही वेळ गेलेली नाही नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 2024 पर्यंत आपण लागवड करू शकतो. खरेतर कांदा हा जीवनावश्यक वस्तुमध्ये टाकने म्हणजे खुळे पणाचे लक्षण आहे. ज्यांना कांदा खाणे परवडत नाही, त्यांनी काही काळ नाही खाल्ला तरी काही फरक पडत नाही. परंतु कांद्याचे भाव वाढले कि सरकारची झोप उडते आणि वेगवेगळ्या उपाययोजना करून भाव पाडण्याचा प्रयत्न केला जातो.
1998 साली दिल्लीत विधानसभेच्या निवडणुका होत्या त्याकाळच्या विद्यमान मुख्यमंत्री शीलाताई दिक्षीत यांचे सरकार कांदा भाव वाढी मुळे गळ-गळले तेव्हापासुन सरकारने आणि राजकिय नेत्याने कांदा भाव वाढला कि धस्का घेतलेला आहे. मग त्यासाठी निर्यात बंदी करणे, MEP वाढवणे निर्यात शुल्क वाढवणे अशी अनेक प्रकारच्या हत्यारे वापरली जातात आणि ती निव्वळ शेतकऱ्याच्या मुळावर घाव घालत असतात.
इकडे शेतकरी कर्जाच्या बोज्या मुळे आत्महात्या करीत आहे. आज त्याचे किती प्रमाण वाढले आहे हे आकडेवारी वरून लक्षात येते परंतु माय-बाप सरकारला त्याचे काही एक सोईर सुतक नाही. शेती मालाला थोड भाव आला की काही तरी कारण काढुन भाव पाडले जातात. आम्ही अन्नधान्य आयात करू अश्या प्रकारच्या वलगना केल्या जातात भिती दाखवली जाते.
असो तरी कांदा उत्पादकाने घाबरण्याचे अजीबात कारण नाही. कांद्याचे भाव सरकार ठरवत नाही. तो विकणारा व खाणारा यांच्यातील मेळ आहे. सरकार कारण नसताना मध्ये हस्तक्षेप करते, याचे कारण आपणास माहित आहे. तेव्हा ज्याच्याकडे पाणी आहे. त्यांनी आवश्य कांदा लावावा यावर्षी दुष्काळ असल्यामुळे पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे सर्वत्र कांदा लागवड होणार नाही.
तेव्हा परत एकदा शेतकरी बांधवाना नम्र पणे सांगु इच्छितो की, कांदा भावा बद्दल सरकार काहीही करू शकत नाही. सरकारने सर्व प्रकारचे हत्यारे वापरून पाहिली आणि ती आता बोथट झालेली आहे. मित्रहो जरी निर्यात बंदी झाली तरी देशा अर्तगत टंचाईच्या काळात असलेली मागणी आपण पुर्ण करू शकत नाही त्यामुळे वर्षभर कांद्याचे बाजार टिकुण राहतील ? दुसरे असे की, बातम्या ऐकुण शेतकरी भराभर कांदा बाजारात आणत आहे तरी असे करू नका, थोडा-थोडा माल काढा म्हणजे आपल्याला तेजी मंदीचा लाभ मिळेल.
धन्यवाद!
येणाऱ्या दिपावलीच्या, अनेक-अनेक शुभेच्छा...
आपला मित्र
बाबासाहेब पिसोरे कृषी भूषण महाराष्ट्र राज्य
मो.नं. 9822991112


stay connected