गरीब मराठ्यांनो...! मनोज जरांगे पाटीलांच्या संवाद दौऱ्यासह मेळाव्यास उपस्थित राहा....सुरेश पाटील.
आता जातीसाठी माती न खाता लबाड, ढोंगी, नालायक श्रीमंत मराठा सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवा.
बीड (प्रतिनिधी)
गरीब मराठा समाजाला शिक्षणात व नोकऱ्यात आरक्षण मिळावे म्हणून गरिबांचा वाघ मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला राज्य सरकारने एक महिन्याचा कालावधी मागीतला होता. परंतु जरांगे पाटील यांनी दहा दिवस वाढवून चाळीस दिवसाचा कालावधी मराठा आरक्षणला दिला. जर राज्य सरकारने आरक्षण न दिल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी येत्या १४ तारखेला मराठा समाजाच्या महामेळाव्याचे आयोजन केलेले आहे. या मेळाव्या संदर्भात बीड जिल्ह्यासह सर्व विधानसभा विशेषतः आष्टी-पाटोदा-शिरूर या विधानसभा भागात मनोज जरांगे पाटील संवाद दौरा करणार आहेत या दौऱ्यासह अंतरवलीत होणाऱ्या महामेळाव्याला गरीब मराठा बांधवांनी आपल्या मुला बाळासह मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिव संघर्ष ग्रुप महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी तथा ज्येष्ठ पत्रकार सुरेश पाटील यांनी केले आहे.
महाराष्ट्रात अनेक मोठमोठ्या श्रीमंत मराठा घराण्याची गेल्या अनेक वर्षापासून सत्ता आहे . ज्यांच्याकडे अनेक मोठमोठे साखर कारखाने, शिक्षणसंस्था, दूध संस्था, सूतगिरण्या, एमआयडीसीतले विविध वस्तू निर्मितीचे कारखाने, हजारो, शेकडो शेत-जमीन, विविध प्रकारच्या आर्थिक सोर्स निर्माण करणारे उद्योग असल्याने श्रीमंत मराठे आजपर्यंत अनेक वर्ष सत्ता स्वतःच्या ताब्यात ठेवण्यास यशस्वी झालेले आहेत, परंतु अनेक वर्षापासूनचा आरक्षणाचा प्रश्न सोडवू शकले नाहीत. त्यामुळे गरीब व कष्टाळू मराठ्यांना राजकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, लाभ मिळालेला नाही. ज्या सोईसुविधा सर्व समाजाला मिळायला पाहिजे होत्या त्या न मिळाल्यामुळे गरीब मराठा आणि श्रीमंत मराठा यांची दरी दिवसेंदिवस वाढत गेली, गेल्या अनेक वर्षापासून कष्टाळू व गरीब मराठा बांधवांना आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणाची आणि नोकऱ्यांची चिंता वाटू लागल्याने आपल्यालाही स्वतंत्र आरक्षण असावे असा विचार मनात येत असल्याने मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. आपल्यालाही आरक्षण मिळावे म्हणून अनेकांनी आज पर्यंत बलिदान दिलेले आहे अजूनही देत आहेत गरीब मराठ्यांना शिक्षणात व नोकऱ्यांत आरक्षण असणे ही काळाची गरज आहे. त्यामुळेच गरिबांचे प्रतिनिधित्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची हाक देताच अख्खा महाराष्ट्र आंदोलनात सहभागी झाला आहे. विधानमंडळात मराठा सदस्यांची संख्या मुख्यमंत्र्यांनसह एक तृतीयांश बहूमत असतानाही साधा मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढू शकले नाहीत, कारण हे सर्व श्रीमंत मराठा ओबीसी असल्याने इतरांना आपल्या आरक्षणात वाटा नको म्हणून की काय? स्वर्गीय विनायकराव मेटे साहेबानशिवाय विधानमंडळात मराठा आरक्षण मिळावे म्हणून एकाही लोकप्रिनिधींनी प्रश्न उपस्थित केलेला नाही. आणि आता मराठा समाजाच्या गरिबीची जान असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या सुरत-सुर मिसळून मराठ्या नेत्यांसह त्यांचे बगलबच्चे व चमचे पुढे मागे फिरताना व मनोज जरांगे पाटील यांच्या बरोबर फोटो काढताना दिसत आहेत. अशा लबाड, स्वार्थी, ढोंगी नालायक मराठा कार्यकर्त्यांची लबडी सकल गरीब मराठा समाजाने ओळखावी. आणि भविष्यात जातीसाठी माती न खाता कर्तृत्ववान व्यक्तींना भले तो कोणत्याही जाती धर्माचा किंवा पंथाचा असला तरी त्याला निवडणुकीत मतदान करावे. अशे आवाहन सुरेश पाटील यांनी केले आहे.
निस्वार्थी, गरीब व कष्टाळू मराठी समाजाच्या मतदानावर श्रीमंत झालेल्या लबाड, ढोंगी, निष्क्रिय लोकप्रतिनिधींना आणि त्यांचे निष्क्रिय कार्यकर्त्यांना निवडणुकीत आपली जागा दाखवावी. असे आवाहनही शिव संघर्ष ग्रुप महाराष्ट्र राज्यांचे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सुरेश पाटोळे यांनी समाज माध्यमांत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.


stay connected