Jalna Maratha Reservation Protest : जालन्यामध्ये मराठा समाजाचे आंदोलन पेटलं
जालन्यामध्ये मराठा समाजाचे आंदोलन पेटलं आहे. अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांनी हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. या घटनेच्या निषेधार्थ उद्या दि २ सप्टेबर रोजी बीड जिल्हा बंद पाळण्यात येणार आहे .
यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीमध्ये ८ पोलिसांसह अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर जालन्यामध्ये जाळपोळीच्या घटना देखील घडल्या. जालन्यातील मराठा समाजाच्या या आंदोलनामध्ये आतापर्यंत नेमकं काय घडलं
जालन्यात आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं?
- मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली २९ ऑगस्टला संभाजीनगर-सोलापूर महामार्गावर मोर्चा.
- जालन्याच्या अंतरवाली सराटी येथे मराठा समजाच्या आंदोलकांनी आमारण उपोषणाला सुरुवात केली होती.
- उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्याशी फोनवरून संवाद साधला होता.
- मुख्यमंत्र्यांनी मनोजर जरांगे यांच्याकडे आमारण उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती.
- मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते.
- उपोषणाच्या चौथ्या दिवशी १ सप्टेंबरला म्हणजे आज २२ गावांनी कडकडीत बंद पुकारला होता.
आमरण उपोषणाला बसलेल्या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला.
- आंदोलनकर्त्यांनी विरोध करत पोलिसांवर तुफान दगडफेक केली. याला प्रत्युत्तर देताना पोलिसांनाही लाठीचार्ज आणि अश्रुधूरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.
- आंदोलक आणि पोलिसांच्या झटापटीमध्ये ८ पोलिसांसह अनेक जण जखमी झाले. जखमींमध्ये महिला आंदोलकांचा देखील समावेश आहे.
- या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले.
stay connected