बहुजन रयत परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा ; यापुढेही समाजासाठी ही काम करत रहाणार - रमेश तात्या गालफाडे

 बहुजन रयत परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा ; यापुढेही समाजासाठी ही काम करत रहाणार - रमेश तात्या गालफाडे



केज (प्रतिनिधी)


मी गेली पाच वर्षापासून आपल्या बहुजन रयत परिषदेचा प्रदेश अध्यक्ष म्हणून काम करत आहे, राज्यभरातील मातंग समाजासह सर्व समाज घटकातील सर्वांनी मला सांभाळून घेतले प्रेम दिले त्याबद्दल मी  आपला सर्वांचा ऋणी आहे, माझ्या काही अडचणीमुळे बहुजन रयत परिषदेचे काम करणे शक्य नसल्यामुळे  मी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनाम देत आहे.  समाजातील एक घटक म्हणून कार्यकर्ता म्हणून समाजा सोबत आपल्या सोबत सदैव राहील, आपण आणि राज्यभरातील सहकार्य केलेल्या कार्यकर्त्यांचा ऋणी आहे असे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे संस्थापक अध्यक्ष बहुजन रयत परिषद महाराष्ट्र.यांच्याकडे रमेश तात्या गालफाडे यांनी भेटुन दिले आहे. 


बीड जिल्ह्यातील सर्व मातंग समाजाचे कार्यकर्ते पदाधिकारी रमेश तात्या प्रतिष्ठानचे पदाधिकारी सर्व रमेश तात्या गालफाडे यांच्या पाठीशी उभे राहून  जो  निर्णय तात्या घेतील ते आम्हाला मान्य असल्याचे मत रमेश पाटोळे यांनी व्यक्त केले 
रमेश रघुनाथ गालफाडे





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.