राजीव गांधी इंटरनॅशनल स्कूलचे तालुका स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश....
राजीव गांधी इंटरनॅशनल स्कूल येथे जिल्हा क्रिडा संकुल नाशिक अंतर्गत मालेगांव ग्रामीण तालुका स्तरीय बुद्धिबळ व फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचे उदघाटन संस्थेचे संस्थापक सन्मानीय श्री. कमलाकर जी पवार सर यांनी केले. तसेच मुख्याध्यापिका सौ. शबनम शेख, मालेगांव तालुका चे क्रिडा संयोजक श्री. काकड सर व इतर शाळेतुन क्रिडा शिक्षक व प्रशिक्षक हे उपस्थित होते.उदघाटन प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्र संचालन करत असतांना जयश्री ठोके यांनी या स्पर्धेत १४ ते १९ वर्षा आतील मुले व मुली यांनी सहभागी झाले आहेत असे सांगितले. फुटबॉल स्पर्धेत १७ वर्ष वयोगटातील राजीव गांधी इंटरनॅशनल स्कूल च्या विध्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवुन जिल्हा स्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच बुद्धिबळ स्पर्धेत राजीव गांधी इंटरनॅशनल स्कूल च्या १४ वर्षातील विद्यार्थी १) अभिर हिरे २) पलाश खडेलवाल ३) अर्णव आहीरे
१७ वर्षातील विद्यार्थी १) पार्थ निकम २) सुमेध सुर्यवंशी ३) वैष्णवी ठोंबरे ४) गायत्री हलवर यांची जिल्हा स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. वरील सर्व विद्यार्थ्याना शाळेचे संस्थाचालक सन्माननीय कमलाकर जी पवार सर, मुख्याध्यापिका सौ. शबनम शेख, क्रिडा शिक्षक युवराज डोळे व जयश्री ठोके , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
stay connected