कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे काँग्रेसची भूमिका . ठाण्यातील बंदला काँग्रेसचा जाहीर पाठिंबा

 कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे काँग्रेसची भूमिका . ठाण्यातील बंदला काँग्रेसचा जाहीर पाठिंबा



उल्हासनगर दि :-  (रमेश कांबळे)  सातत्याने मराठा समाजाच्या आंदोलन वेगळे वळण घेत आहे सर्व स्तरातून त्याला पाठिंबा मिळत आहे.उद्या होणाऱ्या ठाणे बंद ला पाठिंबा देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना ठाणे काँग्रेस चे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी सांगितले की सर्व जाती समाजांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस कटिबध्द आहे म्हणूनच ओबीसी आरक्षणासह कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे ही ठाणे काँग्रेसची भूमिका आहे. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राम भोसले यांनी मराठा समाजातील लोक आजही आर्थिक दृष्ट्या मागासलेले आहेत त्यामुळे मराठा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन सरकारने बदलला पाहिजे असे सांगितले

         उद्याच्या बंदला काँग्रेसने शांततेच्या मार्गाने पाठिंबा दिला आहे व पदाधिकाऱ्यांनी बंद मध्ये आहिंसक मार्गाने सहभागी होण्याबाबतच्या सूचनासह,ठाणेकर नागरिकांनीही बंदला पाठिंबा देण्याबाबत ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी आवाहन केले असल्याची माहिती त्यांनी या प्रसंगी दिली.पत्रकार परिषदेस काँग्रेस चे ज्येष्ठ नेते राम भोसले, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष विजय बनसोडे,सांस्कृतिक विभाग अध्यक्ष स्वप्नील कोळी हजर  होते.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.