जोरदार पावसाने नादुरुस्त झालेली विद्युत लाईन संतोष मस्के यांच्या तत्परतेमुळे झाली सुरु!
---------------------------------------
आष्टी/प्रतिनिधी
तालुक्यातील बावी परिसरामध्ये काल सायंकाळी दोन-तीन तास जोरदार पाऊस बरसल्याने या भागात अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले,यामध्ये वीज वितरण कंपनीची मेन लाईन आष्टी,बावी,डोईठाण मार्गे धामणगाव विज उपकेंद्राला जाते या मेन लाईन ला देखील कालच्या पावसाचा तडाखा बसला,या लाइनला लागून असलेली दुसर्या लाईन चा पोल या लाईन वर झुकल्याने पुढील दहा-पंधरा गावाचा सर्व विद्युत प्रवाह खंडित झाला होता.हा फॉल्ट लक्षात आल्यानंतर लगेच दादेगावचे ग्रामपंचायत विज सेवक म्हणून कार्यरत असलेले संतोष मस्के यांनी कार्यतत्परता दाखवत येथील समस्येचे निराकरन करून विद्युत प्रवाह सुरळीत केला यावेळी त्यांच्यासोबत धामणगावचे लाईनमन बाळु वांढरे, शहाजी कर्डीले,ज्ञानेश्वर कर्डीले,रवि भोसले,जाधव,बनसोडे,भगवान बोराडे आदींनी परिश्रम घेतले.
हे काम बनकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झाले असल्याची माहिती संतोष म्हस्के यांनी तेजवार्ताला दिली आहे.
stay connected