कुकडी सल्लागार समितीच्या बैठकीतील आ.बाळासाहेब आजबे यांच्या मागणीला यश

 कुकडी सल्लागार समितीच्या बैठकीतील आ.बाळासाहेब आजबे यांच्या मागणीला यश




 कुकडीचे पाणी सीना धरणात दाखल, लवकरच मेहकरी धरण भरून घेणार 
---आ बाळासाहेब आजबे

आष्टी प्रतिनिधी 



पुणे येथे ना.चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कुकडी कालवा सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीत आपण आजची मतदार संघातील परिस्थिती पाहता कुकडी योजनेचे पाणी सीना व मेहकरी धरणात सोडणे गरजेचे असल्याची मागणी केली होतीत्या मागणी नुसार समितीच्या सदस्यांनी कुकडीचे पाणी सोडण्या बाबत सूचना दिल्या, त्या मागणीला आज यश आले असून सीना धरणात पाणी सोडण्यात आले आहे त्यामुळे येत्या काही दिवसात सीना धरणातून मेहकरी धरणात पाणी सोडण्यात येणार असल्याचे आ.आजबे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले 

       शनिवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक पुणे येथे आयोजित करण्यात आली होती या बैठकीला मा.ना चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत आ.बाळासाहेब आजबे काका यांनी सिना व मेहकरी धरण पाण्याने भरुन घेण्याची मागणी केली...

या बैठकीला मा.ना. दिलीपरावजी वळसे पाटील, मा.ना राधाकृष्ण विखेपाटील,आ.बबनरावजी पाचपुते,आ राम शिंदे, आ.अशोक बापू पवार,आ.अतुल बेनके,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील . तसेच कालवा सल्लागार समितीचे सचिव सांगळे साहेब उपस्थित होते.. पुढे बोलताना आ बाळासाहेब आजबे म्हणाले की या बैठकीत मतदारसंघातील पाण्याच्या प्रश्नाविषयी व आजची परिस्थिती पाहता आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघात पाण्याची भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे दुष्काळ सदृश्य परिस्थिती झाल्याने तात्काळ मेहकरी व सीना धरण कुकडीच्या पाण्याने भरून घेणे आवश्यक आहे त्यासाठी कुकडी योजनेतून अगोदर सीना धरणात व सीन धरणातून मेहकरी धरणात पाणी सोडणे गरजेचे आहे त्यासाठी सल्लागार समितीने तात्काळ सूचना द्यावा अशी मागणी केली होती. त्या नुसार सूचनेची दखल घेत तात्काळ सल्लागार समितीने कुकडीचे पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार दोन दिवसापूर्वीच सीना धरणामध्ये कुकडीचे पाणी दाखल झाले आहे सीना धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होतात लगेच सीना धरणातून मेहकरी धरणामध्ये पाणी सोडण्यात येणार असून मेहकरी धरण पूर्ण पणे भरून घेण्यात येणार असल्याचे आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी सांगितले यामुळे भविष्यातील येणारी पाण्याची अडचण दूर होण्यास मदत होणार आहे सलग चौथ्या वर्षी आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या प्रयत्नाने मेहकरी धरण भरून घेण्यात येत आहे मेहकरी परिसरातील हजारो शेतकऱ्यांचा सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे तर शेतकरी पुत्र आमदार बाळासाहेब आजबे हे शेतकऱ्यांसाठी शेती प्रश्नाला प्रथम प्राधान्य देत असल्याने आजपर्यंत मेहकरी धरण सलग चार वर्षे भरण्याच्या त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे त्यामुळे या परिसरातील व आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील शेतकरीबांधवांच्या वतीने आमदार बाळासाहेब आजबे काका यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.