India ची धास्ती ? राष्ट्रपतींच्या लेटरहेडवरूनच India नाव गायब, मोदी सरकारने लिहिले - President of Bharat, तर विरोधकांकडून टीका

 India ची धास्ती ? राष्ट्रपतींच्या लेटरहेडवरूनच India नाव गायब, मोदी सरकारने लिहिले - President of Bharat, तर विरोधकांकडून टीका 


 मुंबई : काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने एक ट्विट केले आहे. यामध्ये जी-20 परिषदेसाठी तयार करण्यात आलेली एक निमंत्रण पत्रिका शेअर करण्यात आली आहे. यावर 'प्रेसिडेंट ऑफ इंडिया' ऐवजी 'प्रेसिडेंट ऑफ भारत' असे लिहिण्यात आले आहे. तसेच जी-20 परिषदेसाठी राष्ट्रपतींकडून पाठवण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेवर 'रिपब्लिक ऑफ भारत' असा उल्लेख आहे. त्यामुळे काँग्रेसने सरकारला 'INDIA' पासून इतकी भीती कसली आहे? असा सवाल केला आहे. केंद्र सरकार राज्यघटनेतून 'इंडिया' शब्द हद्दपार करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर संभाजीराजे छत्रपतींनी प्रतिक्रिया दिली. इंडिया शब्द बदलून भारत करणार असेल, तर काही चुकीचं नसल्याचे त्यांनी म्हटले. तसेच त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना मराठा आरक्षणावरून एक मुद्दा सुचवला आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला मागास म्हटले नाही. पहिल्यांदा मराठा समाजाला मागास ठरवायला हवे, असे ते म्हणाले. मोदी सरकारनं 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची घोषणा केली आहे. या अधिवेशनात इंडियाचं नाव बदलून भारत करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर काँग्रेसनं मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. इंडिया हे नाव हटवून देशाचे नाव भारत हेच असेल, असा निर्णय मोदी सरकार घेणार असल्याची चर्चा सुरु असताना आता विरेंद्र सेहवागने एक ट्विट केले आहे. यामध्ये त्याने 'टीम इंडिया नाहीतर टीम भारत,' असे म्हटले आहे. भारताने आज वनडे वर्ल्डकपसाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या संघाला भारत नाव असलेली जर्सी परिधान करायला यावेळी मिळेल, असे संकेतही सेहवागने दिले आहेत. इंडिया हे नाव हटवून देशाचे फक्त भारत असे नाव कायम ठेवण्याचा निर्णय मोदी सरकार लवकरच घेईल, अशी चर्चा असताना सोशल मीडियावर अनेक ट्विट केले जात आहेत. महानायक अमिताभ बच्चन यांनीही आज 'भारत माता की जय' असे ट्विट केले आहे. तसेच जी -20 परिषदेसाठी तयार करण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेवरही 'President of Bharat' असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच अधिकृतपणे नाव बदलले जाईल, अशी चर्चा आहे

 सर्व प्रमुख विरोधी पक्षांनी भाजपाला पराभूत करण्यासाठी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुका इंडिया आघाडी म्हणून लढवणार असल्याचं विरोधकांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर आता सत्ताधाऱ्यांकडून इंडिया नावाला विरोध करण्यात येत आहे. एवढंच नव्हे, तर संसदेच्या विशेष अधिवेशनात इंडिया नाव हटवण्याचा प्रस्तावही मांडण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा रंगत असताना आता चक्क देशाच्या राष्ट्रपतींच्या लेटरहेडवरूनच इंडिया नाव गायब झाल्याचं एका व्हायरल पत्रावरून दिसत आहे. देशाच्या राष्ट्रपतींना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर 'President of India' अशाच नावाने आजतागायत संबोधण्यात येत आहे. मात्र, जी२० सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींना राष्ट्रपतींनी पाठवलेल्या सहभोजनाच्या निमंत्रण पत्रामधून इंडिया शब्दच गायब करण्यात आला आहे. इंडियाच्या जागी 'President of Bharat' असा उल्लेख करण्यात आल्यामुळे त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरून विरोधकांकडून तीव्र शब्दांत आक्षेप घेण्यात येत आहे








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.