जालना जिल्ह्यातील सराटी अंतरवाली येथील भ्याड हल्ल्याचा आष्टीत जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने जाहीर निषेध
----------------------------------------------------------
आष्टी / राजू म्हस्के :- जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या साठी मनोज जरांगे यांनी अन्नत्याग करून लोकशाही मार्गाने आपल्या मागण्या सरकारकडे मागत असताना तेथील मराठा समाजातील आंदोलकांवर पोलिस प्रशासनाकडून झालेल्या भ्याड व अमानुष लाठीचार्जचा व सरकारचा जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने निवेदनाद्वारे जाहीर निषेध करीत आहोत, संबंधित आंदोलन कर्त्यावर ज्या कोणी पोलीस कर्मचाऱ्यांनी अमानुष पद्धतीने लाठी हल्ला केला अशा कर्मचाऱ्याला त्वरित निलंबित करावे व त्याचा वर गुन्हा दाखल करावा व निपराध लोकावरील व आंदोलकां वरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने आष्टी चे नायब तहसिलदार बाळदत्त मोरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.
निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालन्यात अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाने आंदोलन सुरू केले होते. आंदोलन करणे आमचा हक्क आहे. कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन करत असताना, पोलिस निरीक्षक, पोलीस कर्मचारी यांनी आंदोलनकर्त्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, एकीकडे उपोषण सुरू असताना दुसरीकडे सत्तेच्या माध्यमातून समाज बांधव यांच्यावर कारवाई म्हणुन अमानवी, अमानुषपणे लाठीमार करून आंदोलन करणाऱ्या मराठा समाज बांधवांवरील अन्यायकारक लाठीचार्ज केला गेला. राज्यसरकार व पोलिस अधिकारी यांच्या आदेशानुसार हुकुमशाही सरकारचे धोरण लक्षात घेऊन प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला लाठीचार्ज चा आदेश मानवतेला काळिमा फासणारा व कलंकित करणारा असा आहे. शिंदे फडणवीस व पवार यांच्या राक्षसी सरकारचा जाहीर निषेध करीत आहोत असे निवेदनात म्हटले आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. “सरकार हमसे डरती है पोलीस को आगे करती है”. जिजाऊ ब्रिगेड आष्टी तालुक्याच्या वतीने मराठा आंदोलनकर्त्यांना जाहिर पाठिंबा देत आहोत असे जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने करण्यात येत आहे.या निवेदनावर जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष शिवमती सुवर्णा गिर्हे, शिवमती विद्या चव्हाण, अनिता निंबोरे, शिवमती माधुरी तवले, छाया ताई कदम आदींच्या सह्या आहेत.
stay connected