अनाथमुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन दरबारी जाऊन पाठपुरावा करणार. - माहिती अधिकार कार्यकर्ते श्री.बाबु देवकर*
*अनाथ आश्रमातील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप*
आईवडिलांच्या कुशीतील लहान मुलांचे बालपण सुवर्ण कालखंडाचे असते. तेच खरे बालपण! परंतु समाजातील कित्येक बालकांच्या नशिबी असे बालपण येतच नाही. अशा अनाथ मुलांची दिवाळी गोड होण्यासाठी अमरावती येथिल येथील शिक्षणतज्ञ रवींद्र इंगळे तसेच सामाजिक कार्यकर्त्या आधारस्तंभ फाउंडेशनच्या संस्थापिका सौ.अपर्णा इंगळे तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते बाबू देवकर तसेच युवा उद्योजक भरत घोडके यांनी मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केल.
या अनाथ मुलांना आईवडिलांचा सहवास मिळत नाही. मग अशा या कोवळ्या मुलांना कुठल्यातरी अनाथअश्रमात स्थान मिळते. त्यांचे तेच कुटुंब बनते. या अनाथ मुलाच्या , समाजाप्रति आपले काही देणे लागते या विचाराने प्रेरित होऊन सामाजिकतेची जाणीव ठेवून श्री. अनंत झेंडे यांच्या मार्गदर्शनातून बाबा आमटे सामाजिक संस्था घुगलवडगाव तालुका श्रीगोंदा या ठिकाणी हा प्रकल्प चालवला जातो अनाथाश्रमातील मुलांना गरजेच्या शैक्षणिक वस्तूंचे वाटप करण्यात आले. समाजातील अशा जाणत्या, निराधार अनाथाविषयी कळवळ जिव्हाळा असणाऱ्या श्री.अनंत झेंडे यांचे कार्य अभिमानास्पद आहे.
stay connected