कड्याच्या पोलीस सुकन्येचा राजधानीत विशेष सन्मान
पोलिस आयुक्तांकडून विशेष प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह
------------
राजेंद्र जैन/कडा
----------------
कडा येथील रहिवाशी तथा मुंबईत महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधिक्षक श्रीमती मंदाताई घोगरे उर्फ शुभदा प्रदीप चव्हाण या वरळी येथील जोशी मार्ग पोलिस ठाण्यात पोनि पदावर कार्यरत असताना प्रत्यक्ष परिस्थितीजन्य पुरावा नसताना त्यांनी एका खूनाचा तपास करुन या गुन्ह्यातील तिनही आरोपींना न्यायालयाने सश्रम कारावास व प्रत्येकी पंचवीस हजाराचा दंड ठोठावला. पोलिस दलातील त्यांच्या कामगिरीची दखल घेत पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी उत्कृष्ट अपराध सिध्दी केल्याबद्दल त्यांचा प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव केला आहे.
आष्टी तालुक्यातील कडा येथील रहिवासी तथा मुंबईत महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभागात पोलिस उपअधिक्षक पदावर कार्यरत असलेल्या श्रीमती मंदाताई घोगरे उर्फ शुभदा प्रदीप चव्हाण यांनी मुंबईत आपल्या कर्तृत्वाचा आगळावेगळा ठसा उमटविला असून, पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडून त्यांना उत्कृष्ट अपराध सिध्दी केल्याबद्दल प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आल्यामुळे सर्वस्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील एका साहसी सुकन्येने पोलिस दलात केलेली उत्कृष्ट कामगिरी आष्टीकरांची मान अभिमानाने उंचावणारी ठरली आहे.
-------%%------
stay connected