पर्यावरण सण साजरे करण्यासंबधी नागरीकांमध्ये प्रसारमाध्यम, सोशल मिडीया इत्यादींद्वारे जनजागृती

 पर्यावरण सण साजरे करण्यासंबधी नागरीकांमध्ये प्रसारमाध्यम, सोशल मिडीया इत्यादींद्वारे जनजागृती




उल्हासनगर (रमेश कांबळे ) दि :- पर्यावरण सण साजरे करण्यासंबधी नागरीकांमध्ये प्रसारमाध्यम, सोशल मिडीया इत्यादींद्वारे जनजागृती करणेबाबत देखील निर्देश प्राप्त झाले आहेत.

केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ तसेच महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण, वने व वातावरणीय बदल विभागाकडून प्राप्त निर्देशानुसार शहरातील नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये होणारे प्रदुषण रोखण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरीस वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच शहरात आगामी काळात येणा-या गणेशोत्सवा दरम्यान पर्यावरण सण साजरे करण्यासंबधी नागरीकांमध्ये प्रसारमाध्यम, सोशल मिडीया इत्यादींद्वारे जनजागृती करणेबाबत देखील निर्देश प्राप्त झाले आहेत

त्या अनुषंगाने महापालिका आयुक्त  अजीज शेख, मा. अति. आयुक्त डॉ. करुणा जुईकर, मा. उप आयुक्त (पर्यावरण) डॉ. सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण विभागप्रमुख सौ. विशाखा सावंत यांनी विभागामार्फत उल्हासनगर शहरातील नागरीकांसाठी घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन केले आहे.

सदर कार्यक्रमादरम्यान पत्रकार यांनी सदर स्पर्धा घरगुती नागरीकांसाठी मर्यादीत न ठेवता सार्वजनिक उत्सव मंडळांकरीता देखिल नियोजन करावे असा आग्रह धरला. त्यांस मा. आयुक्त महोदय यांनी संमती दर्शविली. सदर स्पर्धेमध्ये सहभागी होण-या नागरीकांमधुन विजेते निवडण्यात येणार असुन त्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्हे देवून गौरविण्यात येणार आहे.

सदर स्पर्धेची नागरीकांना माहिती होवुन जास्तीत-जास्त नागरीकांनी स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे याकरीता आवाहन करणेच्या उद्देशाने दिनांक २९/०८/२०२३ रोजी पालिका आयुक्त अजीज शेख यांच्या हस्ते स्पर्धेचा QR Code, वेबसाईड, टि-शर्ट व पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

 यावेळी सदर ठिकाणी महापालिकेचे उपायुक्त अशोक नाईकवाडे, सहा. संचालक, नगररचनाकार खोब्रागडे, मुख्य लेखा परिक्षक देशमुख, मुख्य लेखा अधिकारी किरण भिलारे, दत्तात्रय जाधव, विनोद केणी, अंकुश कदम, परमेश्वर बुडगे, श्रीम. मोहिनी धर्मा, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, महेंद्र धिंडे व इतर कर्मचारी व पत्रकार बंधु उपस्थित होते.

सदर कार्यक्रमामध्ये सोहम फाऊंडेशनचे राजेश देठे, वृक्ष फाऊंडेशनच्या ज्योती तायडे, केसरी गणेश मित्र मंडळाचे सतिश मराठे हे देखील उपस्थित होते. अशी माहिती उल्हासनगर महानगर पालिकेच्या जनसंपर्क अधिकारी छाया प्रकाश डांगळे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.