*स्वामी विवेकानंद पतसंस्था:शिक्षकांची कामधेनू*.
कडा/आष्टी _ *स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे कार्य उत्तम प्रकारे चालू असुन शिक्षकांची कामधेनू म्हणूनच पतसंस्था कार्यरत आहे* .
असे प्रतिपादन आष्टी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्र गर्जे यांनी व्यक्त केले.
कडा येथील स्वामी विवेकानंद पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास त्यांनी भेट दिली असता त्यांचा सत्कार जेष्ठ सदस्य बबनराव गिरी यांच्या हस्ते करण्यात आला.
त्यावेळी ते बोलत होते, यावेळी गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव, मनोज यादव उपस्थित होते,
पुढें बोलतांना राजेंद्र गर्जे म्हणाले की,"शिक्षकांच्या छोट्या मोठ्या अडचणीला पतसंस्था मदत करत असुन विश्वासू संचालक मंडळ असल्याने संस्थेची भरभराट होत आहे". शाल,फेटा व श्रीफळ देऊन मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
पतसंस्थेचे व्यवस्थापक ज्योतीराम देसाई,तज्ञ मार्गदर्शक मनोज यादव गणेश सोनवणे सर व जाधव सर यांनी मनोगत व्यक्त केले.



stay connected