आष्टी येथे आष्टेडू मर्दानी आखाडा स्पर्धा होणार संपन्न..!
----------------------------------------
आष्टी /प्रतिनिधी
बीड जिल्हा आष्टेडू मर्दानी आखाडा असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.तरी आपण सर्व कोचेस व सर्व खेळाडूंनी नोंद घ्यावी. ज्या खेळाडूंना सहभागी व्हायचं असेल त्यांनी आपला सहभाग शनिवार पर्यंत नोंदवावा.अशी माहीती महेश काकडे सर यांनी दिली आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार भीमराव धोंडे साहेब यांच्या हस्ते रविवार दिनांक १७ रोजी सकाळी नऊ वाजता होणार आहे. कार्यक्रमाचे बक्षीस वितरण युवा नेते डॉ अजय दादा धोंडे यांच्या हस्ते होणार आहे बीड जिल्हा आष्टेडू मर्दानी आखाडा जिल्ह्याचे अध्यक्ष प्राध्यापक दादा विधाते व जिल्ह्याचे सचिव महेश काकडे जिल्ह्याचे उपाध्यक्ष पत्रकार युवराज खटके, स्कोच निकिता काकडे शेतकरी शिक्षण संस्थेचे प्रशिक्षण अधिकारी श्री डी बी राऊत, प्राचार्य डॉ.हरिदास विधाते सर, गिलचे सर,माऊली बोडखे सर, शेंडे सर अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य निशिगंध सर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या स्पर्धेचे ठिकाण पंडित नेहरू विद्यालय डियर कॉलेज हॉल येथे होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना नाव नोंद करायची असेल अशा विद्यार्थ्यांनी महेश काकडे यांच्याकडे संपर्क करावा.संपर्क क्रमांक .8788041862
या कार्यक्रमाचे आयोजक नितिन निमोणकर, विठ्ठल डोके सर, मुख्याध्यापक गोरख सरकाळे,संतोष टेकाळे, अमोल निमोणकर,आदींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या मर्दानी खेळामध्ये लाठी काठी,दांडपट्टा, तलवार,डबल स्टिक,कुर्हाड चक्र,व स्टिक फाईट तसेच हस्तकला आदी खेळ खेळले जाणार आहेत.


stay connected