आधुनिक श्रावणबाळ ह.भ.प.जालिंदर गुंड यांचा मातोश्री व सरपंच अजय गुंड यांचा आजीचे दुख:द निधन
-----------------------------
वाघळुज ता.आष्टी येथिल ह.भ.प.श्री.जालिंदर गुंड महाराज (आधुनिक श्रावण बाळ) यांच्या मातोश्री व ह.भ.प.विठ्ठल गुंड महाराज यांचे चुलती आणी श्री. श्री.अजय गुंड सरंपच यांची आजी कै.भामाबाई साहेबराव गुंड यांचे सोमवारी दि-१८-९-२०२३रोजी पहाटे राहते घरी वृद्धापकाळाणे दुख:त निधन झाले. मृत्यू समयी यांचे वय 92 वर्षे होते. त्यांचा पश्चात पाच मुले सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
संत तुकाराम महाराजांनी सांगितल्या प्रमाने,चंद्रभागे स्नान, तुका मागे हेची
दान, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया ||
आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान परमात्मा पांडुरंगाचे दर्शन व चंद्रभागेत अंघोळ घालवण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या अपंग आईला पाठीवर घेऊन चंद्रभागेमध्ये स्नान व पांडुरंग दर्शनाची इच्छा पूर्ण केली म्हणून ह.भ.प जालिंदर गुंड महाराज यांना आधुनिक श्रावण बाळ म्हणतात.
आपल्या आईची रक्षा कोणत्याही नदी किंवा गंगे मध्ये विसर्जित न करता आपल्या राहत्या घरासमोर खड्डा करून त्यात टाकली व तेथे ह.भ.प.राउत दादा महाराज यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात येईल. त्यांच्या मृत्यू नंतर ह.भ.प. जालिंदर गुंड यांनी नेत्रदान व देहदान करण्याचा संकल्प केला आहे.
जस मानव जन्माचा सोहळा होतो, तसा मृत्युचा सोहळा होयला पाहिजे म्हणून त्यांच्या घरी दहा दिवस भजन व नाम यज्ञाचा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याचा लाभ परिसरातील भाविक दररोज घेत आहेत.
आपल्या आईचा दशक्रिया विधी वाघळुज येथे बुधवार दि:-२७-९-२०२३रोजी सकाळी-१०.वा होईल दशक्रिया विधी निमित्त श्री.क्षेत्र पिंपळा येथिल वैराग्यमूर्ती ह.भ.प.राऊत दादा महाराज यांचे प्रवचन होईल.असे संजय गोविंद गुंड शेठ यांनी सांगितले.
stay connected